ब्रेकिंग न्यूज :
भारत

निकृष्ट दर्जाच्या नावाखाली व्यापारीवर्गाची होतेय लूट ; व्यापाऱ्यांची आमदार सत्यजितकडे धाव ;

Blog Image
एकूण दृश्ये: 887

निकृष्ट दर्जाच्या नावाखाली व्यापारीवर्गाची होतेय लूट ;

व्यापाऱ्यांची आमदार सत्यजितकडे धाव ;

पाठीशी खंबीरपणे उभे राहू: आमदार तांबे

ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही; प्रांतांनाही निवेदन केले सादर 

    संगमनेर: भारत रेघाटे

व्यापारी हे समाज आणि शहराचा कणा आहेत. शहराच्या विकासात व्यापाराचे मोलाचे योगदान आहे. परंतु काही जण निकृष्ट दर्जाच्या नावाखाली व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करत आहेत. कोणत्याही उत्पादनात भेसळ आढळल्यास, सरकारी यंत्रणा त्याची चौकशी करून अहवाल तयार करण्यास सक्षम आहे. जर सरकार किंवा प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालावर शंका व्यक्त केली गेली, किंवा व्यापाऱ्याला त्रास दिला जात असेल किंवा वेठीस धरले जात असेल, तर कदापि गप्प बसणार नाही अशा विकृती विरोध करतो आणि व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथील व्यापारी वर्गाला दिला. 

प्रभा या निवासस्थानी व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार सत्यजित तांबे या़ची भेट घेत आपल्या व्यथा त्यांनी तांबे यांच्याकडे मांडल्या. व्यापारी वर्गाला निकृष्ट दर्जाच्या नावाखाली काही जण ब्लॅकमेल करीत असल्यास तक्रारच व्यापारी वर्गाने लेखी निवेदनाद्वारे भेट घेत दिली. आमदार तांबे यांनी म्हणाले की, सुसंस्कृत संगमनेरसाठी भ्रष्ट संस्कृती कदापि सहन करणार नाही.

आम्ही सामाजिक दुष्कृत्यांच्या विरोधात असल्याचे आमदार सत्यजित यांनी व्यापारी वर्गाला धीर दिला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरची बाजारपेठ भरभराटीला आली आहे. प्रामाणिकपणा ही आमच्या बाजारपेठेची ओळख आहे. येथील विकासात व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे. जर कोणी चुकीचे असेल तर आय करणार नाही. तथापि, गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रास देणे आपली संस्कृती नाही. त्यामुळे जर कोणी व्यापाऱ्यांशी गैरवर्तन केले तर त्यास विरोध केला जाईल, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांच्या सह  प्रांत उमेश उंडे यांनी हे. शहरातील व्यापारी संघटनेच्या वतीने  विविध समस्या आणि चुकीची माहिती देणाऱ्या आणि त्रास देणाऱ्यां व्यक्तिबाबत निवेदन सादर केले.

----- Advertisements -----

              हे होते उपस्थित

यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी, अध्यक्ष योगेश कासट, ओंकार भंडारी, सुमेध संत, शरद गांडोले, अरुण शहरकर, जुगलकिशोर बाहेती, प्रकाश राठी, मकरंद राहतेकर, संतोष कार्ले, गुरुनाथ बाप्ते मुकेश कोठारी, शैलेश मालानी, विलास दिवटे, विश्वनाथ आसावा, विशाल पडतानी, अभय नेहुलकर, गुलाब शाह, रूपेश राहतेकर, निखिल गुंजाळ आदी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी तांबे यांना विविध समस्यांबद्दल माहिती दिली. संगमनेर शहरातील गुळ, तेल इत्यादींच्या पॅकेजिंग आणि इतर व्यापाऱ्यांबद्दल काही लोक चुकीची माहिती पसरवून व्यापाऱ्यांची बदनामी करत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने सदर गुळाचे नमुने तपासले आहेत आणि हा गुळ प्रमाणित असल्याचे सांगूनही काही लोक वैयक्तिक फायद्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेतली. गेल्या काही काळापासून काही समाजकंटक गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास देत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. जर एखादा व्यापारी चूक करत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. परंतु जेव्हा कोणतीही चूक नसते तेव्हा काही माणसे वैयक्तिक फायद्यासाठी अनावश्यकपणे त्रास निर्माण करत असतात. 

     सरकारी यंत्रणेकडून तपासणी केल्या गेल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या अहवालावर शंका घेणे आणि त्रास निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. व्यापारी बांधवांनी प्रामाणिकपणे एकजुटीने लढावे, असे तांबे म्हणाले. कोणत्याही व्यावसायिकाने खचून जावू नये आम्ही व्यापाऱ्यांसोबत आहोत. यावेळी जमलेल्या विविध व्यापाऱ्यांनी संगमनेर शहरातील सध्याच्या अशांतता आणि असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. अनेक व्यापाऱ्यांनी असेही म्हटले की असे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते.

----- Advertisements -----

कुप्रवृत्तीच्या विरोधात लढा उभारू :- मालपाणी 

उद्योजक राजेश मालपाणी म्हणाले की, काही लोक जाणूनबुजून खोटे कागदपत्रे बनवत आहेत आणि व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करत आहेत. त्यांना अडचणीत आणत आहेत. आम्ही सर्वांनी आमदार सत्यजित तांबे आणि प्रांताधिकारी यांच्याकडे याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यां बाबत चिंता व्यक्त केली आहे. परंतु कोणी चुकीच्या पद्धतीने त्रास निर्माण करत असेल तर सर्व व्यापारी एकत्र येऊन या प्रवृत्ती विरुद्ध लढा उभारू असे ते म्हणाले.

 

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद