नागरिकांनी रात्र काढली जागून ; बोट्यात घबराट;
भुकंपाच्या हाद-याने भीतीचे वातावरण ; घरातील वस्तू पडल्या, पत्रे हलले
संगमनेर : प्रतिनिधी
बोटा परिसरातील अनेका गावांना भूकंपाचा तीव्र झटका बसला असून घरावरील पत्रे सरकली मांडण्यावर लावलेल्या वस्तू ,भांडी पटापट खाली कोसळल्या , अनेक हादरे जाणवले, हादऱ्यावर हदऱ्याने परिसर चांगलाच हादरून गेल्याने भीतीचे वातावरण पसरले. नागरिक भीत भीत घराबाहेर पडले, काय झाले कोणालाच काही कळेना. मला आपापसात एकच चर्चा सुरू व्हायला लागली ,हा भूकंप तर नाही ना ? बोटा परिसरातील हा भूकंप सौम्य असला तरी सदरचा भूकंप सायंकाळी साधारण 5 वाजून 25 मिनिट ते 5: 30 च्या दरम्यान झाला असल्याचे समजते.

या परिसरातील राहणारे अमित शेळके, पूजा सोनवणे, खंडू जाधव, अमित कुलकर्णी, शिवाजी तळपे, आर पी आय रामदास आठवले पक्षाचे संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार आदि नागरिकांनी भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती दिली.
बोटा परिसरात भूकंपाने मात्र जमीन चांगलीच हादरल्याचे जाणवले तर या परिसरातील केळेवाडी. कुरकुटवाडी. आंबी दुमाला. एलखोप. अकलापूर. तळपेवाडी. मसवंडी. माळवाडी मोघाडवाडी या ठिकाणीही खूप जोराचे धक्के जाणवले असल्याचे नागरिकांनी सांगितले .
या परिसरात मोठ्याप्रमाणात खडी क्रशर वाल्यांनी उत्खनन केले आहे. साधारण एकाच ठिकाणी असणारी खडी क्रेशर ची बरीच संख्या आहे बोटा परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असेल असा अंदाज वरृतवला जात होता. गेली अनेक वर्ष त्याची पुनरावृत्ती होत असली तरी परिसरातील असलेले खडी क्रेशर बंद करण्यात यावे. उत्खनन झाले याचीही चौकशी करण्यात यावी असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे संगमनेर शहराध्यक्ष कैलास म्हणाले.
नाशिक मेरी येथील वैज्ञानिक चारुलता चौधरी म्हणाले की, याबाबत आपणास कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे याबाबत आत्ताच काही बोलणे उचित होणार नाही. तो भूकंप आहे की नाही हे आत्ताच सांगणे योग्य नाही. याबाबत सकाळी पूर्ण माहिती दिल्या जाईल. तत्वदच नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, ग्रामस्थांनी मोडकळीस आलेल्या घरांमध्ये वास्तव्य करू नये असेही त्या म्हणाल्या

एकीकडे भूकंप ? दुसरीकडे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम
सायंकाळी सव्वा पाच नंतर भूकंप झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात जाम झाली असल्याचे दिसून आले. नाशिक पुणे महामार्गावर एका बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याचे काही नागरिकांनी सांगितले तर काहींनी भूकंप झाल्याच्या चर्चेने आळेफाटा, घारगाव, बोटा, परिसरात वाहनाच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने सांगत तब्बल चार ते पाच तास वाहतूक मोठ्या प्रमाणात जाम झाल्याचे सांगितले या रस्त्यावर वाहनाच्या रांगाच रांगा दिसून आल्या. परंतु या गोंधळात लहान मुले आणि महिला वर्गांना खूप त्रास सहन करावा लागला लांब पडल्याच्या प्रवासासाठी महिला व मुलांना खाली उतरून जेवता येत नव्हते व पाणीही मागता येत नव्हते कारण केव्हा गाडी थोडी सुरू होईल याचा भरोसा नसल्याने प्रवाशांनी या व्यवस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत प्रवाशातील काही तास गाडीतच घालवला. यावर त्वरित उपाययोजना कराव्यात रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी करत आंदोलनही करण्याचा इशारा देण्यात आला.
