ब्रेकिंग न्यूज :
भारत

ना भेटेना जेवण ना भेटेना पाणी ; महिला, मुलांचे अतोनात हाल;

Blog Image
एकूण दृश्ये: 689

ना भेटेना जेवण ना भेटेना पाणी ; महिला, मुलांचे अतोनात हाल;

नाशिक पुणे महामार्ग ट्रॅफिक जाम ; चार पाच तास उलटूनही काही केल्याने वाहने हलेना 

      संगमनेर : प्रतिनिधी

गेली अनेक महिन्यापासून नाशिक पुणे महामार्गावर दुतर्फा रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने तसेच रस्त्यावर आता एकेरीण वाहतूक सुरू असल्याने तासनतास वाहतुकीचा खोळंबा होत असून प्रवासा दरम्यान महिला आणि लहान मुलांना ना भेटेना जेवण ना भेटेना पाणी ! यामुळे अतोनात हाल होत असून महिला आणि लहान मुले अक्षरशा या वाहतुकीच्या समस्येमुळे रंडकुंडीला आल्याने असह्य होणा-या वाहतुकीच्या समस्येवर प्रवाशांनी तीव्रसंताप व्यक्त केला.

आळेफाटा, बोटा, घारगाव या परिसरात गेली काही महिन्या पासून काम सुरू आहे. या रस्त्यावरील वाहतूक समस्या नित्याचीच बाब बनल्याने तब्बल चार ते पाच तासा पेक्षाही जास्त तास वाहतूक खोळंबली असल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभार तीव्र संताप व्यक्त केला.

----- Advertisements -----

     नागरिकांना पुण्यावरून नाशिक, धुळे, शिर्डी, सुरत, सटाणा, त्रंबकेश्वर आदि लांबच्या पल्यासाठी प्रवास करावा लागत असल्याने तसेच या महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने व भरात भर म्हणून एकेरीच वाहतूक असल्याने वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे. रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांबच रांगाच रांगा लागल्या असून वाहन तासनतास रस्त्यावर जागेवरच उभे राहत असल्याने वाहन सोडून प्रवाशांना धाब्यावर जेवायला जाता येत नाही, की पाणीही आणता येत नाही.

महिला, लहान मुलांचे अतोनात हाल होत असून अक्षरशा या समस्येचा सामना काही दिवसापासून करण्याची वेळ आली आहे. रविवार दि 14 संध्याकाळी 6 वाजल्यापासून रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागयाने नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. येत्या काही दिवसात या मार्गावरील रस्ता सुरळीत न झाल्यास जन आंदोलन पुकारण्याचा इशारा प्रवाशांनी दिला .

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम