ब्रेकिंग न्यूज :
भारत

मित्र मैत्रिणीच्या भेटीत आठवणींचा खजिना उघडला

Blog Image
एकूण दृश्ये: 96

मित्र मैत्रिणीच्या भेटीत आठवणींचा खजिना उघडला ;३५ वर्षांनंतर पाणावले डोळे, स्नेहभावाने मैत्रबंध गहिवरले

 

    संगमनेर ( भारत रेघाटे) 

त्या शाळेच्या भित्ती वर्गखोल्या, ते बाक, ती शाळेची घंटा आणि शिक्षकांचे प्रेम. अशा अनेक गोष्टी, त्या 35 पूर्वीच्या जुण्या आठवणी या भेटीने पुन्हा जिवंत झाल्या.        

  संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वीरभद्र विद्यालयाच्या १९९० च्या दहावीच्या बॅचच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ३५ वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या मित्रांनी एकमेकांना भेटताक्षणी पुन्हा आठवणीत गेलेल्या शाळकरी दिवसात प्रवास केला. कुणी बाकांवरील खोड्या आठवल्या, कुणी शिक्षकांची शिस्त, तर कुणी वर्गातील पळापळ आणि हसणे, राग, लोभ ह्या जुन्या आठवणींचा खजिना उघडताच वातावरण भावनांनी भारावून गेले. हशा, आसवे, आणि जणू प्रेमाचा ओलावा पुन्हा जाणवू लागला. मुंबई, कल्याण, नाशिक, पुणे, अकोला अशा विविध ठिकाणांहून आलेले सुमारे ११० माजी विद्यार्थी सहकुटुंब उपस्थित होते. काही क्षणांतच ते सारे पुन्हा शाळकरी झाले .

----- Advertisements -----

यावेळी मात्र या मित्र मैत्रिणीच्या हातात वही, पुस्तक, गाईड असे काहीही नव्हते. जुण्या आठवणीचे अनेक पाने मात्र खुलले होते, प्रत्येक मनाच्या आत. या स्नेहमेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन सोमनाथ गळंगे, सुभाष शेंडगे, मल्हारी सोन्नर, जयराम ढेरंगे आणि राजेंद्र कांबळे यांनी केले. उद्घाटन गायकवाड सरांच्या हस्ते पार पडले. यावेळी नाईकवाडी सर, कोकाटे सर, आर. जी. सोनवणे सर, जे. बी. खेमनर, नावरे, देशमुख सर उपस्थित होते. सर्व गुरूंचा श्रीफळ, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

मेळाव्यात जुन्या दिवसांच्या आठवणींनी सगळ्यांना ओलेचिंब केलं. काही क्षणांत आऩद, हशा मौज मजा, तर काही क्षणांनी डोळे भरून आले. या माजी विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आज शिक्षक, प्राध्यापक, उद्योजक, शेतकरी आणि विविध क्षेत्रात यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून समाजात कार्यरत आहेत, याचा अभिमानही सर्वांना वाटला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गळंगे यांनी तर आभार विठ्ठल वनवे यांनी मानले. या स्नेहबंधातून मैत्रीचा सुगंध, संगीताचा झंकार आणि भावनांचा दरवळ कायम मनात खोलकर सर्व मित्र मैत्रिणीनी असाच कोरून घेतला. आणि शेवटी निरोपा प्रसंगी प्रत्येकाच्या मनात एकच भावना दाटून आली वेळ गेली खरी. पण, मैत्रीचा बंध आजही तितकाच हळवा आणि सदैव जिवंत राहील.त्या जुण्या आठवणीच्या स्नेहात!

----- Advertisements -----

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी