ब्रेकिंग न्यूज :
भारत

मानव कल्याण आणि जीवाच्या कार्यासाठी सत्पुरुष अवतार घेतात ; प. पू. राजधर बाबा

Blog Image
एकूण दृश्ये: 108

मानव कल्याण आणि जीवाच्या कार्यासाठी सत्पुरुष अवतार घेतात ; महंत राजधर बाबा

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा 800 वा अवतरण सोहळा साजरा 

जयघोषाने दुमदुमला परिसर

      कोपरगाव :भारत रेघाटे

             या पृथ्वीवर जिवात्म्याच्या, प्राणिमात्राच्या उत्थानासाठी, रक्षणा साठी परमात्मा सत्पुरुष ईश्वरी अंश रूपाने अवतार घेतात. परम परमात्मा भगवान श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय महाराज यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा अवतार सत्पुरुष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीनी या मानव कल्याण साठी जिवात्म्यासाठी अवतार धारण केला. दया, क्षमा ,शांती आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे, भूतमात्रावरही प्रेम करण्याचा संदेश देणारे, सर्व जीव, समभाव जपणारे, परम पवित्र सर्वज्ञ श्री चक्रधर यांनी या जगाच्या उत्थानासाठी मौलिक कार्य केलेले आहे.

सवंत्सर आश्रमाचे प्रमुख प. पू. श्री. राजधर बाबाजी महानुभाव यांच्या हस्ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतरण महोत्सव निमित्त श्री मूर्तीस मंगल स्नानासह पूजन करण्यात आले. त्यावेळी राजधर बाबा बोलत होते. महंत राजधर बाबा म्हणाले की,जन्म मृत्यू हे माणसाचे आणि प्राण्याचे होतात. जे मानवहित आणि जीवाच्या कार्यासाठी अवतार घेतात तो अवतार दिन म्हणून मानला जातो. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक डॉ . हिरालाल महानुभव यांनी आपले विचार प्रकट केले.

कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या येथे भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अवतरण दिन सर्व पक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.  

----- Advertisements -----

यांची होती विशेष उपस्थिती

कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती कोपरगाव संचलित श्री नामदेवराव परजणे लॉ कॉलेजचे प्राचार्य श्री उबाळे, श्री चक्रधर स्वामी डी एड कॉलेजच्या प्राचार्या थोरे, श्री चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मठपती, श्री चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मराठे श्री चक्रधर स्वामी आय टी आय कॉलेजचे प्राचार्य श्री वाकचौरे यांच्या सह सर्व विभागातील शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसह परिसरातील उपदेशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा यशस्वीपणे पार पडला. याप्रसंगी संवत्सर महानुभाव आश्रमाचे संचालक प पु प म श्री राजधर बाबाजी महानुभव तसेच याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे माजी नगराध्यक्ष आर डी सोनवणे.माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर. संजय सातभाई.माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे. उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक. सामाजिक कार्यकर्ते रामदास खैरे. डी आर काले अमृत संजीवनी चे चेअरमन, पराग संधान, चांगदेव कातकडे, चक्रधर स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुवर्णा महानुभव. श्री चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना मराठे तसेच पंचक्रोशीतील सदभक्त मंडळी उपस्थित होते. हा 800 वा अवतरण दिवस महोत्सव मोठ्या आनंदोत्सवाने साजरा करण्यात आला यावेळी भक्तगणांनी या अनुभूतीचा लाभ घेतला.

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी