ब्रेकिंग न्यूज :
भारत

महायुतीची आभार यात्रा; लाडक्या बहिणींची भरणार जत्रा ;

Blog Image
एकूण दृश्ये: 121

महायुतीची आभार यात्रा; लाडक्या बहिणींची भरणार जत्रा ; युवकांच्या भगव्या टोपीची गर्दी तोबा ; जाणता राजा मैदानावर मंत्यांची जाहीर सभा

        संगमनेर { भारत रेघाटे }

लाडक्या बहीण, भावाने आणि जनतेने दिलेल्या भरभरून आशीर्वादाबद्दल महायुतीच्या महाविजयाचा जल्लोष करण्यासाठी तसेच या आशीर्वादाचे ऋणनिर्देश करण्यासाठी महायुतीच्या वतीने आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एकजुटीने या सभेस मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे यांनी केले आहे.

    रविवार दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता भव्य अशा जाणता राजा मैदान येथे महासभा होणार असून यावेळी शिवसेना मुख्य नेते उप- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रमुख उपस्थिती मध्ये जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच पर्यटन खनिज कर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई, प्रवरा सहकारी कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी , बाळासाहेब पवार, शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे, शिवसेनेच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांच्यासह महायुती मधील सर्व माजी आमदार खासदार घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष तालुका प्रमुख आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नागरिकाच्या उपस्थितीत आभार सभा होणार असल्याचे रमेश काळे यांनी सांगितले.तत्पूर्वी मोठ्या जल्लोषात हर्षभरीत आनंदाने मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.

    उद्घाटन, रॅली आणि रोड शो 

----- Advertisements -----

दरम्यान आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे काळे यांनी सांगितले. महायुतीच्या विजयाचा मेळाव्याचे औचित्याने रथातून रॅली द्वारे रोड शो काढण्यात येणार आहे .

      तयारी झाली पूर्ण

विशाल अशा जाणता राजा मैदानावर भव्य दिव्य सभामंडप उभारण्यात आला असून त्याची जय्यत तयारी झालेली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाला सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, आपल्या पथकासह, तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे आदींनी या परिसराची पाहणी केली. 

कोण काय बोलणार ? याकडे लागले लक्ष 

विधानसभा निवडणुकीत आ.अमोल खताळ यांच्या रुपाने महायुतीच्या महाविजयाच्या महामेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ कोणते राजकीय भाष्य करतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

----- Advertisements -----

              केले आवाहन.                                 

या कार्यक्रमाची सुनियोजित आणि सुरक्षेची आखणी करण्यात आली असून जिल्ह्यातून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान उपजिल्हाप्रमुख रमेश काळे यांनी केले आहे.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम