ब्रेकिंग न्यूज :
भारत

महेश नवमी निमित्ताने संगमनेर मध्ये निगाली शोभायात्रा

Blog Image
एकूण दृश्ये: 214

संगमनेर मध्ये निघाली शोभायात्रा ; बालाजी मंदिरात रूद्राभिषेक ; महेश नवमी उत्सव साजरा; केरळी बॅन्ड, महिलांच्या टाळ नृत्याने वेधले लक्ष

   संगमनेर प्रतिनिधी

माहेश्‍वरी सभेच्या वतीने आज महेश नवमी निमीत्त आयोजीत शोभायात्रेत केरळी बॅन्ड आणि महिलांच्या टाळ नृत्याने संगमनेरकरांचे लक्ष वेधले. याशिवाय माहेश्‍वरी समाज बंधु-भगिनींची वेशभुषा, शोभायात्रेतील नियोजन बद्धता विशेष आकर्षण ठरली. शोभायात्रेत आमदार अमोल खताळ यांनी सहभागी होत माहेश्वरी बंधू भगिनींना महेश नवमी निमित्त शुभेच्छा दिल्या. 

महेश नवमी निमीत्त श्री बालाजी मंदिरात महेश भगवान रुद्राभिषेक यजमान पल्लवी , शैलेश कासट आणि शिवानी कृष्णा आसावा यांच्या हस्ते संपन्न झाल्या नंतर शोभायात्रेचा शुभारंभ झाला. या शोभायात्रेचे नियोजन व रथ सजावट राजस्थान युवक मंडळाच्या सदस्यांनी केली.

----- Advertisements -----

शोभायात्रेत महेश भगवान रथ, अश्वारूढ बालके, उमा महेशच्या वेशातील बालचमु, महेश वंदना सह भक्ती गीतांवर सुंदर टाळनृत्य करणाऱ्या माहेश्वरी महिला मंडळाच्या सदस्या, बँड पथक, केरळी बँड  डीजे साऊंड सिस्टिम यांचा समावेश होता. संग्राम पतसंस्था, भारतीय जनता पार्टी कार्यकारी समिती व क्षत्रीय समाजाच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. 

शोभायात्रे दरम्यान मालपाणी उद्योग समूहाकडून पेयजल व लस्सी, महेश पतसंस्थेच्या वतीने पेढे, अट्टल परिवाराकडून ज्युस वितरण करण्यात आले. नवीन नगर रोडवर फटाक्यांची आतषबाजी  केली गेली. तर समारोप प्रसंगी अल्पोपहार सेवा श्रीनिवास व राजेंद्र सोमाणी (राजेंद्र उद्योग समूह) यांनी व रसपान सेवा दिली. शोभायात्रेत अबालबुद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी  प्रदेश सभा सदस्य सतीशकुमार बाहेती, संगमनेर तालुका सभेचे अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, सचिव जुगलकिशोर बाहेती, उपाध्यक्ष संजय.मालपाणी, कोषाध्यक्ष सुजितकुमार खटोड, संघटन मंत्री सचिन मणियार, सह-सचिव जयप्रकाश भुतडा, माहेश्‍वरी पंच ट्रस्ट चे अध्यक्ष गिरीष मालपाणी, सरपंच विश्‍वनाथ कलंत्री, उत्सव समिती प्रमुख अतुल झंवर, महेश नवमी उत्सवाचे प्रकल्प प्रमुख सुमित अट्टल, वेणुगोपाल कलंत्री, सिद्धांत झंवर व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin