सावध रहा ,झाडे तोडू नका, झाडे तोडू देऊ नका ! झाडांमुळे माणूस आहे. माणसांमुळे झाडे नाहीत. जगात पहिले झाड आले. नंतर माणसं आली. माणूस गेला तरी, झाड टिकणार ! झाड गेले तर ,माणूस अजिबात टिकणार नाही. महाराष्ट्रात वड, पिंपळ, लिंब, छोटी,
मोठी झाडे लावून बहरू द्या. झाडी बहरण्यासाठी माणसाने काम केलेच पाहिजे असे प्रतिपादन अभिनेते, वृक्षमित्र सयाजी शिंदे यांनी केले.

प्रवरा म्हाळुंगी संगमावर निसर्गरम्य अशा संगमावर नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी अभिनेते शिंदे यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. ते म्हणाले की, जिवंत असेपर्यंत झाडावर प्रेम करा. झाडांचा वाढदिवस साजरा करा. सावध रहा, वृक्ष संवर्धनाचे उपक्रम राबवा. झाडाला जगवू, आपणही जगू असे म्हणत संगमनेर नगर पालिकेने झाडांना जीवदान दिल्याबद्दल या कामगिरीचे त्यांनी भरभरून कौतुक केले.


माझी वसुंधरा अंतर्गत संगमनेर नगरपालिका सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असते. पर्यावरणाची काळजी घ्या, झाडे लावा, झाडे जगवा, भारत माता की जय ,सायकल चालवा ,इंधन वाचवा. कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरण रक्षण करी. वृक्षांचे जतन संवर्धन करा असा मौलिक संदेश देतनगर पालिका शाळा क्रमांक एक ते पाचच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाची मैत्री करण्यासाठी वृक्ष भेटी साठी नगरपालिका ते प्रवरा संगमा वरील शांती घाट पर्यंत विद्यार्थ्यांची दिंडी निघाली. यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका, यांनी सहभाग घेतला.
निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.
संत तुकाराम