ब्रेकिंग न्यूज :
भारत

महिलांचा सन्मान हाच देशाचा, संविधानाचा सन्मान! - ऍड. संघराज रुपवते

Blog Image
एकूण दृश्ये: 65

महिलांचा सन्मान हाच देशाचा, संविधानाचा सन्मान! - ऍड. संघराज रुपवते

प्रा . हिरालाल पगडाल लिखित "स्री शक्तीचा जागर" पुस्तकाचे प्रकाशन 

    पुणे, प्रतिनिधी

राष्ट्र सेवा दलाने केलेला महिला शक्तीचा सन्मान म्हणजे देशाचा, संविधानाचा सन्मान आहे, असे मत संविधान तज्ज्ञ ऍड. संघराज दादासाहेब रुपवते यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून रूपवते बोलत होते.

शिक्षक तज्ज्ञ हिरालाल पगडाल यांच्या 'स्री शक्तीचा जागर' या पुस्तकाचे पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ,२८ सप्टेबरला पुण्यात साने गुरुजी स्मारकात सुशीलाताई दादासाहेब रुपवते यांच्या हस्ते झाले. यावेळी सुगावा प्रकाशनच्या प्रा. उषा विलास वाघ, लेखिका प्राचार्य इंदुमती महावीर जोंधळे, शिक्षिका सुरेखा आडम , सामाजिक कार्यकर्त्या रुबिया अब्दुल शेख यांचा 'स्री शक्ती सन्मान' पुरस्कार देऊन सुशीलाताई रुपवते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे व ऍड. जाकीर अत्तार उपस्थित होते.   आपल्या भावना व्यक्त करताना लेखक प्रा हिरालाल पगडाल म्हणाले की, राष्ट्र सेवा दलाने मला घडवले. विचार करायला, तो मांडायला शिकवले. त्यामुळे मी सामाजिक काम करू शकलो. राजकारणात कृती करू शकलो. लिहू लागलो. या अनुभवातून माझे चौथे पुस्तक प्रकाशित झाले. 

----- Advertisements -----

इंदुमती जोंधळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या मुळे महिला शिकल्या. म्हणून आम्ही लिहू, बोलू लागलो. सावित्रीबाईंचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. या पुस्तकात सावित्रीच्या लेकींचा कर्तबगारीचा आढावा पगडाल यांनी घेतला आहे. म्हणून हे पुस्तक प्रेरणादायी आहे. उषा वाघ यांनी महिला पुरुष बरोबरीने चालतील तर समाजाची प्रगती लवकर होईल. विषमता संपेल असा आशावाद व्यक्त केला. शिक्षिका सुरेखा आडम यांनी आपले अनुभव विषद करताना विषमतेचे अनुभव सांगून सांगितले .तर रुबिया शेख यांनी समाजकार्याचे अनुभव सांगितले. प्रास्ताविक राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिकेत घुले आणि रवींद्र मेढे तर आभार ॲड. समीर लामखडे यांनी मानले. 

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी