ब्रेकिंग न्यूज :
भारत

महिलेचा खून ; संशयीत पती पोलीसांच्या ताब्यात वैजापूरची महिला;

Blog Image
एकूण दृश्ये: 269

महिलेचा खून ; संशयीत पती पोलीसांच्या ताब्यात वैजापूरची महिला; खून जाखुरीत : तर मृतदेह आढळला जंगलात   

    संगमनेर प्रतिनिधी 

वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील 40 वर्षीय महिलेचा संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे खून झाल्याची घटना रविवारी दि. 10 ला मध्यरात्री घडली. संगीता भारत मोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने संगमनेर शहरासह तालुका आणि ग्रामीण भागातील जाखुरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, अमित महाजन,, शिवाजी ढमाले, आशिष आरवडे, सचिन उगले, अनिल उगले, सालोमन सातपुते, मंगेश शिंदे , शरद कोकणे, प्रमोद चव्हाण आदि सह जाखुरीत दाखल झाले .

----- Advertisements -----

याबाबत मयत संगीता भारत मोरे यांचे पती भारत रामभाऊ मोरे ( मूळ नागमठाण,ता. वैजापूर जिल्हा संभाजीनगर, हल्ली रा. मांडे मळा, जाखुरी ता. संगमनेर) यांनी तालुका पोलिसात खबर दिली. तालुका पोलिसांना दिलेल्या खबरीत भारत मोरे यांनी असे म्हटले आहे की, पत्नी संगिता, दुसरी पत्नी अलकाबाई, असे एकत्र रहातो. माझे व्याही सोमनाथ बाबुराव सुरसे, यांचेकडे सध्या कामानिमित्त रहात आहोत. माझी मुलगी शितल हि तिच्या पतीसह जाखुरी गावात राहते. माझी पहिली पत्नी संगिता हि नागमठाण येथे राहावयास होती. व ती नागमठाण येथुन आठ दिवसापुर्वी आमच्याकडे राहावयास आली होती.

रविवार दि.१० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मी माझी पहिली पत्नी संगिता, दुसरी पत्नी अलकाबाई, व्याही सोमनाथ सुरसे, सोमनाथ सुरसे यांची पत्नी मुक्ताबाई, सोमनाथ सुरसे यांचा मुलगा नवनाथ सुरसे व आमचा नागमठाण येथील ओळखीचा भागीनाथ चांगदेव माळी (रा.नागमठाण, ता वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) हा रात्री आमच्याकडे आल्याने जेवण करून आमच्याकडेच झोपला होता. त्यानंतर सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मी आमच्या घराचे पाठीमागे असलेल्या फॉरेस्ट मध्ये प्रांतविधी साठी गेलो असता त्या ठिकाणी माझी पहिली पत्नी संगिता भारत मोरे, ही मयत अवस्थेत दिसुन आली. महिलेची हत्या संशयित असलेल्या पतीलाच पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलीस तपासात मृतदेहाच्या गळ्यावर काही खुणा आढळून आल्या. पोलीस प्राथमिक अंदाजानुसार हा पती-पत्नी मधील वाद असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे यामध्ये श्वान आणि ठसे तज.ज्ञांना बोलावण्य आले होते. घरापासून ते घडलेल्या घटनेपर्यंत माग काढला या घटनेत पोलिसांनी पती भारत मोरे यास ताब्यात घेतले तसेच सोबत असलेल्या व्यक्तीचाही या गुन्ह्यात सहभाग आहे का ? याबाबत तालुका पोलीस अधिक तपास करीत आहे. प्रवरा मेडिकल येथे मृतदेह शेवटनासाठी पाठवण्यात आला त्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होईल आरोपीला लवकरच ताब्यात घेऊ असे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे म्हणाले.

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin