ब्रेकिंग न्यूज :
भारत

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीत मैफिलीने मा. मंत्री काल. दादासाहेब रूपवते यांचा 26 वा स्मृतिदिन साजरा

Blog Image
एकूण दृश्ये: 183

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीत मैफिलीने मा. मंत्री काल. दादासाहेब रूपवते यांचा 26 वा स्मृतिदिन साजरा

 मान्यवरांनी दिला दादासाहेब आणि वामनदादा यांच्या आठवणींना उजाळा 

गीतकार सुभाष कर्डक यांच्या गीताला उपस्थितांनी दिली भरभरून दाद

     संगमनेर - भारत रेघाटे

23 जुलै 2025 रोजी सिद्धार्थ नाईट हायस्कूल , दादासाहेब रुपवते शैक्षणिक संकुल , संगमनेर येथे विद्यालयाच्यावतीने कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या 26 व्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांची मैफिल गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

विचार मंचावरील सर्वच सन्मा. मान्यवरांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास जगताप सर यांनी स्वागत केले प्रमुख पाहुण्यांचा उपसितांना परिचय करून दिला. त्यानंतर सर्वच मान्यवरांनी काल. दादासाहेब रूपवते यांच्या विविध पैलूंवर मनोगते व्यक्त केली. दादासाहेबांच्या 26 व्या स्मृतिदिनानिमित्ताने सिद्धार्थ नाईट हायस्कूल येथे काल. दादासाहेब रूपवते यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले गेले. सर्व उपस्थित मान्यवरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

----- Advertisements -----

सिद्धार्थ नाईट हायस्कूल येथे या स्मृतिदिना निमित्त मान्यवऱ बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष बी. आर. कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.एकलव्य घडविण्याचे काम दादासाहेब रुपवते यांनी केले. माझी गोरगरिबाची लेकरे कसे शिकतील यासाठी त्यांनी वस्तीगृहाबरोबर शाळा सुरू केल्याची माहिती बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त एम.डी. सोनवणे यांनी दिली.

यशंतराव चव्हाण आणि दादासाहेब रूपवते यांनी महाराष्ट्राचे राज्यकारण बदलून टाकले. दादासाहेब उपवते यांच्या संदर्भात मी माझ्या पुस्तकात अनेक दाखले दिलेले आहेत. हेच  सर्वात मोठे कॉन्ट्रीब्युशन दादासाहेब रूपवतेंचे असल्याचे शाळा सक्षमीकरण समितीचे अध्यक्ष हिरालाल पगडाल यांनी सांगितले.

----- Advertisements -----

वाईट माणसाच्या सहवासात चांगले माणसे आली तर त्यांचा परिस होतो. असा परिस म्हणजेच दादासाहेब रूपवते असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ए.पी. बनसोडे  म्हणाले.

जी. के. पवार यांनी संस्थेच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा आठवणीचा लेखाजोगा सांगितला.

----- Advertisements -----

यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी सूर्यकांत शिंदे यांनी देखील दादासाहेब रूपवते यांच्या कार्याची माहिती देत अभिवादन केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये काल. दादासाहेब रुपवते आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचे कसे प्रेमाचे , स्नेहाचे ऋणानुबंध होते. त्यांच्या स्मृती आणि विचारांना उजाळा देण्यासाठी विविध गीतांचे गायन वामनदादांचे नातू गीतकार इंजि. सुभाष कर्डक यांनी गीतांतून सादर केले आणि त्यांना योग्य साथ कवी अनिल देशपांडे यांनी दिली. विविध गीतांच्या माध्यमातून दादासाहेब आणि वामनदादांचे विचार उपस्थितांपर्यंत पोहोचविले. त्यांच्या सर्व गीतांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी - विद्यार्थिनी खूपच आनंदी झाले.

----- Advertisements -----

या कार्यक्रमासाठी बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष सन्मा. बी. आर. कदम सर यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. संस्थेचे विश्वस्त एम. डी. सोनवणे सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ए. पी. बनसोडे सर ,शाळा सक्षमीकरण समितीचे अध्यक्ष हिरालाल पगलाल सर , सूर्यकांत शिंदे सर , जी. के. पवार सर , सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ जगताप सर , माघाडे मॅडम ,डॉ. रवींद्र घोसाळे , बी.जी. राऊत सर , कदम मॅडम , सोनवणे मॅडम ,सिद्धार्थ बोर्डिंग चे अध्यक्ष अमोल रोकडे यांसह सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी , पालक आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रस्ताविक मुख्याध्यापक विकास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन डी. बी पवार यांनी तर आभार  डी. डी सांबरे यांनी व्यक्त केले.

----- Advertisements -----

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर