ब्रेकिंग न्यूज :
भारत

मोबाईल आई व्हेईकलचे लोकार्पण रोटरीचा राबवणार उपक्रम; मालपाणी परिवाराचे गिफ्ट

Blog Image
एकूण दृश्ये: 78

मोबाईल आई व्हेईकलचे लोकार्पण रोटरीचा राबवणार उपक्रम; मालपाणी परिवाराचे गिफ्ट 

    संगमनेर ( प्रतिनिधी ) 

रोटरी क्लब ऑफ संगमनेर व रोटरी आय केअर ट्रस्ट संचलित दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या "रोटरी डोळ्यांच्या फिरत्या दवाखान्याचे" लोकार्पण सोहळा नुकताच मालपाणी लॉन्स येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रथितयश उद्योजक राजेश मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती, मुंबईचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्योजक संजय मालपाणी, गिरीष मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्टचे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य, चेतन पंढरीकर, मालपाणी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

प्रकल्प प्रमुख रो. संजय राठी यांनी फिरत्या दवाखान्याचे महत्त्व, त्याची गरज आणि मालपाणी परिवाराने दिलेल्या योगदाना बाबत माहिती दिली. तर रोटरी आय केअर अध्यक्ष रो. संजय लाहोटी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी संस्थेला अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन केले. उद्योजक राजेश मालपाणी म्हणाले की, “रोटरी जगभरात करत असलेल्या कामामुळे प्रेरीत होऊन आम्ही या व्हॅनसाठी आर्थिक मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ संगमनेर सोबत आमचे नाते अजोड आहे. चांगल्या कामासाठी अडचण येऊ देणार नाही.

डी.जी. सुधीर लातुरे यांनी

----- Advertisements -----

रोटरी क्लब वैद्यकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांमध्ये करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आय केअर हॉस्पिटलला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसाठी हवी ती आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

ओमप्रकाश शेटे यांनी त्यांच्या सामाजिक सेवेत रोटरीने नेहमीच साथ दिल्याचा उल्लेख केला. महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात रोटरी करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. “वैद्यकीय क्षेत्रात आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांमध्ये रोटरी सर्वोच्च स्थानी आहे,” असे गौरवोद्गार यावेळी काढले. हा फिरता दवाखाना जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आयोजित डोळ्यांच्या तपासणी शिबिरांसाठी वापरला जाणार असून, ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना थेट याच व्हॅनद्वारे रुग्णालयात आणण्याची सुविधा होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी, सेक्रेटरी सौरभ म्हाळस, माजी अध्यक्ष साईनाथ साबळे, आय केअरचे खजिनदार अजित काकडे, महेश वाकचौरे, आनंद हासे, बद्रीनारायण इंदाणी, पवनकुमार वर्मा, रवींद्र पवार, योगेश गाडे, अरविंद कासट, नरेंद्र चांडक, महेश ढोले, विकास लावरे, मोहित मंडलिक, संकेत काजळे, , राजेंद्र खोसे आदींनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचलन रो. भारतभूषण नावंदर , मंजु मणियार यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष रो. दीपक मणियार यांनी मानले. 

या कार्यक्रमाला संगमनेर रोटरी क्लबचे सर्व सदस्य, अकोले क्लबचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य,आय केअर ट्रस्टचे डॉक्टर- कर्मचारी तसेच संगमनेर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात