लव्ह जिहाद विरोधात हिवाळी अधिवेशनात उठविणार आवाज : खताळ
लाडक्या बहिणी सोबत केले रक्षाबंधन साजरे
संगमनेर ( प्रतिनिधी )
लव्ह जिहाद विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूरला डिसेंबर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा प्रश्न उपस्थित करू असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना दिला.

आमदार खताळ यांच्या जन संपर्क कार्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहर व तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहिणींनी आ. अमोल खताळ यांना राखी बांधली त्याप्रसंगी ते बोलत होते. ही राखी केवळ नात्याची नाही तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहे. आज अनेक ठिकाणी प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून जबरदस्तीने धर्मांतरण करण्यास भाग पाडले जाते. महिलांचा शारीरिक, मानसिक छळ, लैंगिक अत्याचाराने आत्महत्यासारखे गंभीर प्रकार घडत असल्याची कैफियत लाडक्या बहिणीने आमदार अमोल खाता यांच्यासमोर मांडली. अशा देश विघातक कृतीला प्रतिबंध बसण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर लव्ह जिहाद विरोधी कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी लाडक्या बहिणींनी यावेळी केली. यासाठी आपण येथे हिवाळी अधिवेशनात प्रयत्न करणार असल्याचे आमदार अमोल खाता यांनी आश्वासित केले. यावेळी सकल हिंदू समाजाच्या शहर आणि तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लाडक्या बहिणींना दिले भगवे वस्त्र भेट
शहरासह तालुक्यातून आलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी आपले लाडके भाऊ आमदार अमोल खताळ यांना राखी बांधली आपण सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना काहीतरी भेट दिली पाहिजे म्हणून आमदार अमोल खताळ यांनी सर्व लाडक्या बहिणींना हिंदुत्वाचे प्रतीक असलेले भगवे वस्त्र देऊन सन्मानीत केले.
