लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा वारसा पुढे न्यायचा आहे -आ .खताळ
संगमनेर { प्रतिनिधी }
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात संघर्ष करून आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्या साठी काम केले तसेच त्यांच्या लेखणी च्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीच्या विरोधात अन्यायाचा प्रतिकार करत समाजप्रबोधन केले अशा महान लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण विधिमंडळाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपण स्वतः आवाज उठवित पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी दिली.

लहुजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे भाजप माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, महिला जिल्हा उपप्रमुख दिपाली वाव्हळ,महिला शहरप्रमुख वैशाली तारे, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, रेखा गलांडे ,योगेश घोगरे गणेश सस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न घ्यावा अशी मागणी यावेळी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश सचिव विनायक माळवे शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी मंजाबापू साळवे सपना जाधव किशोर वाघमारे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. मागणीचा विचार करून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण स्वतः विधि मंडळात मागणी करून शासन दरबारी पाठपुरावा करू असा विश्वास त्यांनी दिला
आ खताळ म्हणाले की महापुरुषांच्या स्मृतींना आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जात असतात. लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हे कमी शिकलेले असताना सुद्धा त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून शोषित व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना खर्याअर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी कायम संघर्ष केला. त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचाराचा वारसा घेऊन आपण सर्वजण मार्गक्रमण करू असे ही आ खताळ यांनी सांगितले सूत्रसंचालन शिवसेना उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले प्रस्ताविक मंजाबापू साळवे यांनी प्रास्ताविक केले आभार आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी मानले.
