लोकांच्या डोक्यात विष पेरणाऱ्या षड्यंत्र करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा :- थोरात
विरोधकांवर डागली तोफ
लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर ; कारस्थानाचे लाईव्ह प्रसारण ; शांती मोर्च्याला जमला विराट जनसागर ; विविध संघटनेचा जाहीर पाठिंबा
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणाऱ्या तसेच लोकांच्या डोक्यात विष पेरले जात आहे, षड्यंत्र आखले जात आहे. तालुक्यात विकासा ऐवजी संगमनेरात गाढवाचा नांगर फिरवत असल्याने अशा गावगुंडांचा वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनसमुदायाला केले आहे.

आम्हाला नथुराम गोडसे व्हायला भाग पाडू नका असे म्हणत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याने दिलेल्या धमकीचे आणि सज्जड इशा-याचे तीव्र पडसाद संगमनेर शहरासह तालुक्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्याने तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी हजारोच्या संख्येने संगमनेर नवीन नगर रोड येथे हजारोच्या संख्येने जनसागर एकवटला.
तत्पूर्वी यशोधन जनसंपर्क कार्यालया पासून स्वाभिमानी संगमनेर तालुका ,सकल हिंदू समाज व विविध पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी आणि विविध आध्यात्मिक व वारकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ भव्य दिव्य असा शांती मोर्चा काढला.

यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उद्योजक रामहरी कातोरे, माजी शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा, प्रा हिरालाल पगडाल , शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, शहर प्रमुख रवींद्र कानकाटे, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे कैलास कासार, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. मला संघर्ष नवीन नाही . विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आपली तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताहात वाढण्याचे काम आपण केले खांडेश्वर, रामेश्वर, अकलापूर, बाळेश्वर, निझर्णेश्वर आदि मंदिरांचे विकासकामे बांधकाम व सुशोभीकरण आपणच केले आहे. वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ हे कोणत्याही पक्षाचे अथवा जातीचे होऊच शकत नाही. संत, महंत आणि वारकरी संप्रदायाने समाजाला मानवतेचा विचार दिला आणि तोच विचार घेऊन आपण पुढे चाललो आहे. संगमनेर सारखा सुकून अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही असे बाहेरचे लोक आवर्जून सांगतात.
ईव्हीएम चा घोटाळा तुमच्यासाठीच होता असे आता सर्वच म्हणताना दिसून येत आहेत. तालुक्याचा विकास मोडला जात आहे. विरोधक आता सहकार मोडण्यास निघाले. कारण आता या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे जनता आता शांत बसणार नसल्याचे सांगत थोरात यांनी एकप्रकारे विरोधकावर तोफच डागली.
विखे पाटील आणि मी एकत्र फुगडी खेळलो
वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ हे कोणत्याही पक्षाचे अथवा जातीचे होऊ शकत नाही. महंत रामगिरी महाराजांच्या सप्त्याहामध्ये विरोधक असलेले विखे पाटील आणि मी दोघांनी एकत्र फुगडी खेळण्याचे तमाम जनतेने पाहिले नाही का ? असा सवालही त्यांनी जाहीर सभेला केला. वारकरी संप्रदाया समोर श्रीमंत ,गरीब लहान-मोठा असा भेद नसतो. मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय आहे.
प्रेक्षकांमधून "आय लव यू साहेब "असे म्हणताच आता तुम्ही खरे जागे झाले आहात. असे बाळासाहेबांनी स्वतः च्य चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य करीत जनतेला संबोधित केले. बस स्थानका समोर वाकडेतिकडे भाषणे झाली, वातावरण आणि मने कलुषीत करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांच्या डोक्यात विष पेरले जात आहे, षड्यंत्र आखले जात आहे , गावगुंडांचा बंदोबस्त करा. मागील आठ महिन्या पासून या तालुक्यात काय सुरू झाले ? याचा विचार आपण केला पाहिजे ! शांतता आणि प्रगतीची वाटचाल करणारा हा तालुका आहे. संगमनेर सारखा सुकून अन्यत्र कुठेही पहायला मिळत नाही असे बाहेरचे लोक आवर्जून सांगत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आम्ही सर्वाना एकत्र करत आनंद देण्याचा प्रयत्न केला. गुण्या गोविंदाने या तालुक्याच्या विकासासाठी अनेकांची भूमिपूजन आपल्याच हाताने झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
भगवी टोपी घालून हिंदू झालो असे समजण्याचे कारण नाही . आमदार खताळ यांनी उमेदवार होण्याच्या आधी भगवी टोपी कधी घातली का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे नाटक कशासाठी असा प्रतिसवाल त्यांनी केला. आम्ही वारकरी आहोत. आम्ही हिंदू आहोत, परंतु आम्ही कोणाचा द्वेष करत नाही. आता मात्र मतांसाठी घोटाळे सुरू असून आपल्या बोलण्यातून बाया बापड्यांना प्रभावित करण्याचे काम सुरू असल्याचे थोरात म्हणाले.
लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून एक खेळणे एक हत्यार म्हणून वापरले केला जात आहे. तालुक्यात अनेक षड्यंत्र आखले जात आहे. तालुक्यामध्ये गुंडगिरी, दहशत वाढली आहे. तथा कथित महाराज गादीचा अपमान करतात कसे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा असे आवाहन थोरात यांनी केले.
कोणा घरचे घरगडी आहात ?_
गावागावातून अनेक कार्यकर्ते शहरा मध्ये येत होते. मात्र या मोर्चामध्ये लोक येऊ नये याकरिता पोलिसांनी चारही दिशांनी गाड्या अडवल्या. ही बातमी कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच खडसावले .तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी आहात का ? असा सवालच पोलीस प्रशासनाला थोरात यांनी केला.
_अखेर दाखवलाच तो व्हिडिओ_
थोराताच्या स्टिंग ऑपरेशन मधून सत्यता उघड ;अखेर दाखवला तो व्हिडिओ वारकरी संप्रदायात नथुराम कसे घुसला अशा बुर्खाधारी नथुरामचा पर्दाफाश करत घुलेवाडीत घडलेल्या घटनेची सत्यता माणसासमोर आणून ती पोलीस प्रशासनाला आणि जनतेला लाईव्ह प्रक्षेपणातून दस्तुरखुर्द माजी मंत्री थोरात यांनी अखेर सर्व रचलेले कुभांडाचे लाईव्ह प्रसारण दाखवले.
अमृत सेना करणार उभी !
शहरातच नव्हे तर राज्यामध्ये काय प्रकार चालू आहे ? राज्य शासनाचे धोरण कसे सुरू आहे ? हे जनतेला चांगले माहिती आहे. छगन भुजबळचे हाल कसे झाले ! त्यांचे महत्त्व कसे कमी झाले हे जनता जाणून आहे. तर प्रवीण गायकवाड, संजय शिरसाठ यांचे मारहाणीचे प्रकरण सर्वश्रुत असतानाही भलेही माणिक कोकाटे चुकले असतील परंतु माणिक कोकाटेंचा यात कसा बळी गेला हे आवर्जून जनसमुदायाच्या लक्षात थोरात यांनी आणून दिले. शहर आणि तालुक्यात वाढत चाललेली गुंडागर्दी याला प्रतिबंध करण्यासाठी आणि अमृत सेनेची निर्मिती करणार असल्याचे थोरात यांनी ठणकावून सांगितले.

मीही विपक्ष आमदार नाही सत्तेतला आहे; सत्यजीत तांबे
झालेला पराभव आम्ही मोठ्या मनाने मान्य करतो; जनता चुकत नसते आमचे हिंदुत्व दुसऱ्याला त्रास देणारे नाहीच. नेत्याची भूमिका ही पेटवायचे नसते मिटवायची असते. चुकला त्याला खडसावण्याची आणि जो खरा आहे त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची भूमिका बाळासाहेब थोरात यांनी गेली 40 वर्षापासून निभावलेली आहे .यापुढे झालेली टीका आम्ही अजिबात सहन करणार नाही असा खरमरीत इशाराही आमदार सत्यजित तांबे यांनी दिला. समाजधुरीनावर हल्ले झाले. "मूंह में राम बगल मे छूरी" असे कोणी करत असेल तर कदापिही सहन केले जाणार नाही. बाळासाहेब थोरातांना दिलेली धमकी केवळ थोरात यांनाच नसून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक माणसाला दिलेली आहे. अशा दुष्ट प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत नवीन नगर रोड प्रांत कार्यालया समोर सत्यजित तांबे यांनी विरोधकांना ठणकावून सांगत मी पण सत्तेतलाच आमदार असून एक आव्हानच यावेळी दिले. हा मोर्चा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या तालुक्याचा मोर्चा आहे.. येथील प्रत्येक तरुणाच्या, महिला भगिनीच्या, संस्थेच्या पाठीशी आम्ही भविष्यातही खंबीरपणे उभे असल्याचे तांबे म्हणाले. संगमनेरसह तालुक्यातील विकासात बाळासाहेब थोरात यांचेच महनीय योगदान आहे. सर्वांना बरोबर घेऊन हा तालुका उभा केला. सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. जातीभेद करण्याचे नाही असे सांगताना ते म्हणाले की, नवीन आमदाराने आमचे हिंदुत्व पाहू नये. तथाकथित कीर्तनकार नथुराम गोडसेचे उदातीकरण करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववाद जपणारे आहोत. हा मोर्चा थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा आहे. तालुक्यात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वांना सोबत बरोबर घेऊन जाण्याची भूमिका थोरातानी राबवली.निळवंड्याचे पाणी आणि घराघरांमध्ये शिक्षण देण्याचे काम बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांवर टीका करणाऱ्यांचा आपण जाहीर निषेध करतो. दंगली बंद झाल्या म्हणून येथे व्यापार सुरू झाला. आम्ही कोणत्याही जाती धर्माचे लागूनचालन करीत नसून आम्ही तुमच्यापेक्षाही प्रखर हिंदुत्ववादी आहोत असा इशाराच त्यांनी दिला. आम्ही टीका सहन करणार नाही. कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरू नका ! असेही सत्यजित तांबे म्हणाले.

_आम्हाला पुढच्या पिढीची काळजी वाटते_ डॉ जयश्री थोरात
तालुक्यामध्ये तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. हे आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे हा आपला आदर्श होवू शकत नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे .आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. असे नथुराम गोडसे जर समोर आले तर तुमची लेक नाही तर संपूर्ण तालुका तुमच्या सोबत ढाल बनून उभा राहील असा इशाराच जयश्री थोरात यांनी दिला. तुमची या तालुक्याला गरज आहे असे नमूद करत संगमनेरची संस्कृती आपल्याला जपायची आहे असे थोरात म्हणाल्या.
