ब्रेकिंग न्यूज :
भारत

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

Blog Image
एकूण दृश्ये: 152

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार ;जीवे मारण्याचे धमकी; दोघांवर गुन्हा दाखल

     संगमनेर :प्रतिनिधी

30 वर्षीय महिलेची एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात करून त्याने सदर महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरात नेवून वेळोवेळी अत्याचार करत जिवे मारण्याची धमकी दिल्याने संगमनेर शहर हादरुन गेले.

ही धक्कादायक घटना ऑक्टोबर 2018 ते 2 ऑगस्ट 2025 दरम्यान घडली. तीस वर्षीय महिलेने लग्न करण्याची मागणी करताच बहादर तरुणाने उडवा उडवीचे उत्तरे देत जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हेतर त्या तरुणासह त्यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकाने सदर महिलेस बेदम मारहाण केली. तिला एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सदर पिडीतेने शहर पोलीसात मंगळवार 4 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार दाखल केली.

----- Advertisements -----

फिर्यादीवरून ऋषीकेश नामदेव सोनवणे, नातेवाईक राहणे मळा या दोघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 376 (2) एन 115 (2) 352 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पगारे हे पुढील तपास करीत आहेत.

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin