ख्यातनाम साहित्यिक मारुती चित्तमपल्ली निसर्गात लीन ; निसर्गवारा स्थिरावला
संगमनेर { भारत रेघाटे }
-------मराठी भाषेसह तीन चार भाषा अवगत असलेले ख्यातनाम साहित्यिक निसर्ग लेखक, निसर्ग मित्र, पक्षी प्रेमी, वन्यजीव अभ्यासक तथा अरण्यऋषी मारुती भुजंगराव चित्तमपल्ली (वय ९३) यांचे सोलापुरात निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्या बरोबर निसर्गात एक वेगळी पोकळी निर्माण झाली . मारूती चितमपल्ली हे गुरूवार दि १९ जून रोजी निसर्गात लीन झाले.

जीवन आणि भटकंती एक समीकरणच होते सरांचे. तब्बल 60 ते 65 वर्ष त्यांनी जंगल वनात आपल्या जीवनाची भटकंती केली. निसर्गदत्त लाभलेले साहित्याचे लेणं मराठी माणसासह मराठी भाषेला दिलेले साहित्य ही अनमोल देणगी ठरली. निसर्गातील पशुपक्ष्यांचे गुपितं सांगणारे, समृद्ध असलेला त्यांच्या साहित्याचा असलेला अनमोल ठेवा होय. निसर्ग आणि पक्ष्यांशी नातं जोडलेले लेखक, एक संशोधक म्हणून चित्तमल्ली आपल्यातून गेल्याने या निसर्ग लेखकाचे साहित्याचा विसर्ग कधीच होणार नाही. खरंतर त्यांचे साहित्य हा निसर्गाच्या लेण्यात खोवलेला एक स्वर्ग होता. निसर्ग माणसाला भरभरून देतो चित्तमपल्ली यांनी निसर्गाला आणि साहित्याला भरभरून दिले.

सोलापूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. पक्षी, जंगलाविषयी अतूट प्रेम त्या संबंधित असलेली साहित्यकृती मराठी साहित्याला मिळालेली जणू निसर्ग देणगीच होय. चकवा चांदणं" ही आत्मकथा खूप प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी निलवंती, जंगलाचं देणं, घरट्या पलिकडे, रातवा, रानवाटा आदी चक्रवा चांदन, पक्षाविषयी अशा अनेक साहित्यकृतीने पर्यावरण आणि निसर्गाची काळजी घेतली. मानव, निसर्ग, पक्षी वन्यजीव मराठी साहित्य याबद्दल सतत काळजी करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. निसर्गाशी एकरूप झालेले चितमपल्ली यांच्या जाण्याने मराठी साहित्य बरोबर निसर्गाची न भरून निघणारी एक पोकळी निर्माण झाली.

