कोयता हवेत फिरवून 'खबरदार कोणी पुढे याल ! असे म्हणत लुटले ; व्यावसायिकासह महिलेचे दागिने घेवून चोरटे फरार; श्रीराम नगरात आठ जणांचा थरार; तिघांना न्यायालयीन कोठडी ; पोलीस आरोपीच्या मागावर
संगमनेर : प्रतिनिधी
हवेत कोयता फिरवून खबरदार कोणी पुढे याल तर ! अशी धमकी देत व्यावसायिकासह एका महिलेलेचे दागिने ओढत चोरटे फरार झाले. हा प्रकार संगमनेर शहरातील श्रीराम नगरात सायंकाळी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले! तर एका महिलेच्या गळ्यातील दागिने घेवून फरार झाले. सदर चोरटे दरोडाच्या तयारीनेच आले होते. ही घटना मंगळवार दि 10 ला संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरात मध्यवर्ती भागात घडल्याने एकच खळबळ उडाली. या याप्रकरणी शहर पोलिसांनी आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील धीरज राजेंद्र पावडे २३, लक्ष्मीनगर, संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर २४, अठरा पगड, वेल्हाळे रोड, दीपक सोमनाथ वैराळ २३, ढोलेवाडी यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली असून उर्वरीत पाच आरोपींचा शोध सुरु आहे. याबाबत शिरीष अनंत शहाणे (रा.पावबाकी रोड, संगमनेर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. शहाणे यांचे श्रीरामनगर येथे बालाजी कार मोटार रिपेरिंग व स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. ते मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुकानात बसले होते. त्यावेळी त्यांचा मॅनेजर बाळासाहेब भुजबळ (रा. मालदाड रोड, संगमनेर) हा देखील दुकानात होता. दारू पिणारे सात ते आठ मुले शहाणे यांच्या दुकानात दम दाखवत घुसले.

त्यांच्यातील एकाच्या हातात कोयता होता. त्यातील काहींना शहाणे यांनी ओळखले. धीरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहकरे, दीपक वैराळ, संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या, आणि निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर यांच्यासोबत आणखी दोन अनोळखी होते. त्या सर्वांनी शहाणे आणि त्यांचे सहकारी बाळासाहेब भुजबळ यांना शिवीगाळ करत दोघांची गच्ची पकडून मारहाण केली. तसेच धीरज पावडे याने त्याच्या हातातील कोयत्याचा धाक दाखवत जबर मारहाण केली. त्यावेळी शहाणे त्यांना म्हणाले की, आम्हाला मारू नका असे म्हणून जवळच्या लोकांची शहाणे यांनी मदत मागितली असता धीरज पावडे याने त्याच्या हातामधील कोयता हवेत फिरवून 'खबरदार कोणी पुढे याल तर, मी तोडून टाकील' अशी धमकी दिली. आम्हाला हप्ता चालू करायचा, नाही तर दुकानाची तोडफोड करून जाळून टाकील अशी धमकी भरत तात्काळ त्यांच्यातील दोघाजणांनी बाळासाहेब भुजबळ यास मारहाण करून काउंटरची चावी घेत दहा हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. धीरज पावडे याने शहाणे यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्याची चैन हिसकावून घेतली. चोरट्यांनी आपला मोर्चा जिजामाता उद्यानाकडे वळवत भाग्यश्री दिलीप गायकवाड चैतन्यनगर, यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचे पंधरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचत पसार झाले. त्यापैकी घटना घडल्या नंतर केवळ दोन तासांमध्ये यापैकी तिघा जणांना पोलिसांनी पकडले.
पोलिसांनी धीरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहोकरे, दीपक वैराळ, संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या, निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर तसेच अनोळखी दोन व्यक्तीसह आठ जनाविंरुद्ध गुन्हा दाखल केला असून
धीरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहोकरे, दीपक वैराळ, या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार दि.१५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करीत आहेत
