कार्यवाही ने डीजे चालकांचे धाबे दणाणले ; दोघांवर कार्यवाही वाहनासह साहित्य जब्त; आयोजकांवर होणार कडक कार्यवाही ; शोध सुरू
संगमनेर प्रतिनिधी
मिरवणुकीत परवानगी नसतानाही मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन डीजे चालकांवर गुन्हे दाखल केले असून या डीजे चालकाचे वाहन आणि साहित्य जप्त केले आहे. डीजे बाबत पहिलीच कारवाई असल्याने डीजे व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली डीजे चालकाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आता पोलिसांनी आपला मोर्चा आयोजकाकडे वळवला असून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही लवकरच गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांकडूनच आता कठोर पावले उचलली जात असून या कारवाईमध्ये दोन डीजे धारकांंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संगमनेर खुर्द येथील राहुल सुभाष शिंदे 24 यांचा सर्वज्ञ साऊंड डीजे राजापूर येथील ऋषिकेश सोमनाथ सोमनाथ हासे वय वर्ष 27 राजापूर साईरत्न साऊंड डीजे वर कार्यवाही करण्यात आली.
भारतीय न्याय संहिता कलम २२३, पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३, १५, आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस राहुल पांडे, आत्माराम पवार यांनी या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली असून घटनेचा पुढील तपास जाधव करीत आहे. मिरवणुकी मध्ये डी जे सिस्टीम लावुन कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी वाजवून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण केल्या प्रकरणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्यानुसार कोणताही लाऊड स्पीकर किंवा डीजे वाजवण्या पूर्वी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी देताना आवाजाची पातळी डेसिबल आणि वेळेचे नियम पाळणे बंधनकारक असते. मात्र, काल शहरात आयोजित केलेल्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी पोलिसांकडून लाऊड स्पीकर आणि डीजे वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही, मिरवणुकीत काही ठिकाणी डीजे वाहने सामील करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या गंभीर प्रकारानंतर संगमनेर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दोन डीजे वाहनांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणी शहर पोलीस बंडू टोपे कानिफ जाधव पुढील तपास सुरू आहेत लवकरच आयोजकांवर कार्यवाही होणार असल्याचे समजते.
