ब्रेकिंग न्यूज :
भारत

कीर्तनात राडा; कीर्तन बंद ; महाराजास शिवीगाळ, हल्ला ; गुन्हा दाखल

Blog Image
एकूण दृश्ये: 49

कीर्तनात राडा; कीर्तन बंद ; महाराजास शिवीगाळ,  हल्ला ; वाहनाचेही मोठे नुकसान चौघासह अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल 

     संगमनेर

कीर्तन सेवा सुरू असताना अर्दाड असणा-या चौघा जणांनी कीर्तनात व्यत्यय आणत कीर्तन सेवा बंद पाडत महाराजांना शिवीगाळ करून त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्या या प्रकारणी शहर पोलीसात चौघासह आठ ते दहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

   घुलेवाडीच्या हनुमान मंदिरात 13 ते 20 दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला शनिवारी गालबोटं लागले. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी निलेश दगडू गायकवाड यांनी अचानक कीर्तन सुरु असताना उभे राहून महाराजांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वैभव दगडू गायकवाड, 

----- Advertisements -----

निलेश दगडू गायकवाड, अनिल बबन राऊत, तुळशीराम हरिश्चंद्र दिघे यांच्यासह अन्य आठ ते दहाजणांणु शिवीगाळ करीत कीर्तनात गोंधळ घातला आणि महाराजांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. आरोपींनी कीर्तनकाराच्या एम एच 14 जी एस 2856 वाहनाचेही मोठे नुकसान केले आहे. राजगुरुनगर येथील कीर्तनकार हभप संग्रामबापू महाराज भंडारे यांचे कीर्तन सुरु असताना परिसरात राहणाऱ्या चौघा नागरिकांसह अज्ञात आठ ते दहा जणांनी महाराजांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांच्या या घटनेने शेकडों भाविक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला आणि कीर्तनाचा कार्यक्रमही थांबवावा लागला. याप्रकरणी अतिथी असलेल्या स्वरुप राऊत यांच्या फिर्यादीवरुन 14 जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या भारतीय न्यायसंहितेच्या कलम 131, 300, 189 (2), 190, 351 (2), 352, 324 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान हा सत्ता सुरू होता शनिवार दिनांक 16 रोजी रात्री कीर्तन सुरू असताना या चौघांनी कीर्तन बंद पडत महाराजांना हल्ला करत गाडीचे मोठे नुकसान केले याप्रकरणी शहर पोलीस तपास करीत आहे.

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin