ब्रेकिंग न्यूज :
भारत

कीर्तन महोत्सवाने होणार साई मंदिराचा वर्धापन दिन साजरा ;

Blog Image
एकूण दृश्ये: 111

कीर्तन महोत्सवाने होणार  साई मंदिराचा वर्धापन दिन साजरा ; रामायणाचार्य ढोक, भंडारे, परांजपे महाराजांचे होणार कीर्तन                    

     संगमनेर प्रतिनिधी 

तालुक्यातील चंदनापुरी येथील प्रसिद्ध साईधाम मंदिरात द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्री साईसत्वरित्र पारायण आणि कीर्तन महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. 

चंदनापुरी येथे श्री साईबाबांनी काही का, वास्तव्य केले असल्याचे येथील बुजुर्ग व्यक्ती सांगतात. साईबाबांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या चंदनापुरी गावात सुंदर मंदिर साकारुन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आलेली होती या घटनेस आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मंदिर परिसरात यात्री निवास, स्वयंपाक गृह, स्वच्छता, स्नानगृह उभारुन लोकार्पण करण्यात आले आहे. वर्षभर अनेक साईभक्त, वारकरी, जैन साधू-साध्वी यांनी येथे वास्तव्य करुन दर्शनाचा लाभ घेतात. दर गुरुवारी साईसत्चरित्र पारायण, महाआरती प्रसाद असे उपक्रम राबवण्यात येतात. त्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या मंदिराच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने सकाळी श्री साईसत्चरित्र पारायण, शुक्रवारी दि.23 रोजी सायंकाळी 7 ते 9 संग्राम बापू भंडारे महाराज, शनिवारी (दि.24) रामराव महाराज ढोक, रविवारी (दि.25) रोहिणी महाराज परांजपे यांचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार असून या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ चंदनापुरी, श्री साई मुळगंगा भक्त परिवार यांनी केले आहे.

----- Advertisements -----

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin