कोरेगाव भीमा विजय स्तंभ बचाव समितीवर डॉ. रवींद्र घोसाळे ; आंबेडकरी चळवळीत नवा ऊर्जावान चेहरा
संगमनेर : प्रतिनिधी
आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या कोरेगाव भीमा विजय स्तंभ बचाव समितीच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी संगमनेरचे धडाडीचे समाजसेवक डॉ. रवींद्र विठ्ठल घोसाळे यांची निवड करण्यात आली आहे.

आंबेडकरी समाजाच्या ऐतिहासिक लढ्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभा जवळील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याच्या संघर्षात पुढाकार घेणारे समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी डॉ. घोसाळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनहितासाठीच्या निःस्वार्थ कार्याची दखल घेत ही नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे संगमनेर आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून समाजातील विविध स्तरांतून डॉ. घोसाळे यांच्या कार्याचा गौरव होत आहे.

डॉ. घोसाळे हे तेजस सेवा प्रतिष्ठान, व्हिजन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर संगमनेर तसेच महिला ब्युटी असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष असून समाज उत्थानासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांचे कार्य शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या मार्गदर्शन क्षेत्रात उल्लेखनीय आहे. राज्य संघटकपदी त्यांच्या निवडी मुळे कोरेगाव भीमा विजय स्तंभ बचाव समितीला नव्या उर्जेचे आणि नेतृत्वाचे बळ प्राप्त झाले असून, आंबेडकरी चळवळीत नवे दिशादर्शन होईल, असा विश्वास समाजातून व्यक्त केला जात असून विविध स्तरातून त्यांची प्रशंसा होत आहे. सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास जगताप यांनी कौतूक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

