ब्रेकिंग न्यूज :
भारत

कमिशनच्या वादातून हाणामारी; सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम लंपास ,आरोपी फरार

Blog Image
एकूण दृश्ये: 36

कमिशनच्या वादातून हाणामारी; सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम लंपास ,आरोपी फरार

    संगमनेर ( प्रतिनिधी )

घुलेवाडी परिसरातील फ्लॅट व्यवहारानंतर कमिशनच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी डोळ्यांत मिरची पावडर फेकून, हातोड्याने मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने पळवल्याची घटना शनिवारी (६ डिसेंबर २०२५) रात्री विश्रामगृह समोरील परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये घडली.

प्रणव जोर्वेकर यांच्या फिर्यादीवरून सचिन फटांगरे व विवेक रोहकले (दोघे रा. घुलेवाडी) यांच्यावर संगमनेर शहर पोलीसात भारतीय न्याय संहिता 119 (1) 352, 351 (2) 3 (5) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहा महिने पूर्वी झालेल्या जमिनीच्या व्यवहाराच्या कमिशनवरून वाद वाढत गेला. शनिवारी कार्यालयात भेट घेताना वाद चिघळला आणि आरोपींनी प्रणव जोर्वेकर यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले जाते. यामध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून जबर मारहाण करत सोन्याची अंगठी, चेन आणि सुमारे दोन लाखांची पिशवी लंपास करण्यात आली. परिसर गजबजलेला असतानाही अशी घटना घडल्याने सुरक्षा आणि व्यवहाराबाबत चर्चा रंगली असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस योगेश हासे या घटनेचा तपास करीत आहेत.

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin