कालकथित दादासाहेब रूपवते स्मृतिदिनानिमित्त मुंबई येथे अभिवादन सभेचे आयोजन
संगमनेर { भारत रेघाटे }
बहुजन शिक्षण संघ आणि दादासाहेब रुपवते फाउंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर , मंत्रालया समोर , मुंबई येथे शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजता करण्यात आले आहे.
या अभिवादन सभेच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार ,मा. आमदार उल्हास पवार, मा. आमदार शिरीष चौधरी यासह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. यासाठी बहुजन शिक्षण संघ संस्थेचे अध्यक्ष मा. बी. आर. कदम, बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील दादासाहेब रुपवते यांची प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रातील राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर अभिवादन सभा शनिवार दि. 19 जुलै 2025 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह , जगन्नाथ भोसले मार्ग , नरिमन पॉईंट , मंत्रालयासमोर , मुंबई येथे होणार आहे. या अभिवादन सभेस आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. या कार्यक्रमास आपण अगत्य यावे.
परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.
संत तुकाराम