ब्रेकिंग न्यूज :
भारत

कालकथित दादासाहेब रूपवते स्मृतिदिना निमित्त महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

Blog Image
एकूण दृश्ये: 202

कालकथित दादासाहेब रूपवते 26 व्या स्मृतिदिनानिमित्त सिद्धार्थ नाईट हायस्कूल संगमनेर येथे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

      संगमनेर भारत रेघाटे

कालकथित दादासाहेब रुपवते आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या स्मृती आणि विचारांच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठी गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

    या कार्यक्रमासाठी महाकवी वामनदादा कर्डक यांचे नातू गायक अभियंता सुभाष कर्डक, आंबेडकरी गीतकार तसेच लेखक, विचारवंत, व्याख्याते अनिल देशपांडे हे दादा साहेबांची आणि वामनदादांची विविध गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेरचे मुख्याध्यापक विकास जगताप यंनी केले आहे.

----- Advertisements -----

सदर कार्यक्रम बुधवार दि. २३ जुलै २०२५ सायंकाळी ०७.०० वाजता सिद्धार्थ नाईट हायस्कूल, दादासाहेब रूपवते शिक्षण संकुल, तहसील कचेरी जवळ, संगमनेर येथे होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक विकास जगताप यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दादासाहेब रूपवते आणि आंबेडकरी विचार समाजा पर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या हयातीमध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांनी आंबेडकरी जलसामधून विविध समता ,स्वातंत्र्य . न्याय अशी परिवर्तनवादी पुरोगामी गाणी लिहिली आणि गायली. यामधून समाजाचे संघटन उभे राहिले. डॉ. आंबेडकर असे म्हणायचे माझ्या 10 सभा इतके काम एक आंबेडकरी जलसा करतो. काल. दादासाहेब रुपवते यांनी वामनदादा कर्डक यांच्या शेवटच्या हयाती मधील त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या गायनांचा कार्यक्रमासाठी खूप मदत केली. याचे स्मरण या निमित्ताने होत आहे.

      

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बी. आर. कदम अध्यक्ष बहुजन शिक्षण संघ, एम. डी. सोनवणे विश्वस्त बहुजन शिक्षण संघ, ए.पी. बनसोडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच साहित्यिक हिरालाल पगडाल अध्यक्ष शाळा सक्षमीकरण समिती व बहुजन शिक्षण संघाचे सर्व विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ हितचिंतक आदि उपस्थित राहणार आहेत.   

----- Advertisements -----

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम