६ किलो वजनाचे दोन गोळे काढले महिलेच्या पोटातून ; शस्त्रक्रिया ठरली यशस्वी ; ओवेरियन सिस्टेडेनोमा आजाराने ग्रस्त होती महिला
संगमनेर : भारत रेघाटे
पोटातील असह्य वेदनेने ग्रामीण भागातील एक ज्येष्ठ महिला एका रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता तपासणीची प्रक्रिया पूर्ण होताच, वीस बाय वीस सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे गोळे तपासणीत आढळून आले. डॉक्टरसह रुग्णालयाचे कर्मचारी आपले शर्तीचे प्रयत्न करत सदर महिलेच्या पोटातून सहा किलोचे दोन गोळे डॉ काढतात. या दुर्धर आणि गंभीर आजारातून या महिलेस सही सलामत सोडतात. याबाबतची शस्त्रक्रिया संगमनेर येथील कुटे रूग्णालयातील डॉ. प्रदीप कुटे, भूलतज्ज्ञ डॉ. सोनाली कुटे, असिस्टंट शरद अदसुरे, महेश गांडुळे, संदीप कणसे, अर्फत शेख, यांनी या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आणि तिचे प्राण वाचले.

जि. अहिल्यानगर ता. पारनेर पळशी वनकुटे येथील विठाबाई किसन मधे नावाच्या ६५ वर्षीय महिलेच्या पोटातून ६ किलो वजनाचे दोन गोळे काढण्यात अखेर डॉक्टरांना यश आले.

पाच, सहा वर्षांपूर्वी सदर महिलेला या आजाराची सुरुवात होताच आजारामुळे महिला चांगलीच त्रस्त झाली होती. पोटातील गोळे हळूहळू वाढून सहा किलोचे झाले. यामुळे महिलेला लघवी करण्यासही त्रास होत होता, मूत्रपिंडाचे कामही मंदावत चालले होते, त्यातच कावीळ झाली. तर दुसरीकडे सदर महिलेचे हृदयाचेही ठोके दिवसेंदिवस वाढत होते. शस्त्रक्रियेपूर्वी भूलतज्ज्ञ डॉ. सोनाली कुटे यांनी रूग्णास भूल देत सर्व उपचारांनंतर या महिलेची शस्त्रक्रिया डॉ . प्रदीप आणि टीम ने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. डॉ. प्रदीप कुटे म्हणाले की, रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून पुढील धोका टळलेला आहे. रुग्णावर शस्त्रक्रिया आणि उपचारांचा सकारात्मक परिणाम होत आहे, शारीरिक हालचालींमध्ये बरीच सुधारणा होत असून रुग्ण जेवन घेत आहे. डॉ. कुटे म्हणाले की, रुग्ण तपासणी साठी आलाच नसता, अथवा त्यास वेळेवर उपचार मिळाले नसते तर रुग्णाचा कावीळ वाढून ,रुग्ण कमकुवत झाला असता. गाठ फुटून पोटात विष तयार होऊन कदाचित मृत्यूलाही सामोरे जावे लागले असते. डॉ.कुटे पुढे सांगतात की, विशेषतः,या रुग्णाचे वय आणि आरोग्य तसेच तिचे कमी वजन यामुळे शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची झाली होती. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे वजन ३९ किलो होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे वजन ३३ किलोच भरले.

नवीन नगर रोड येथील प्रसिद्ध कुटे हॉस्पिटल मधील डॉ. प्रदीप कुटे यांनी या महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून सहा किलो वजनाचे दोन गोळे काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. सदर महिलेला ओवेरियन सिस्टेडेनोमा या आजाराने ग्रस्त केले होते. सदर रुग्णाला बसण्यास, उभे राहण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. खाण्यासही त्रास होत होता. रुग्णाला खाल्ल्यानंतर उलट्या होत असत. ही महिला गेली पाच-सहा वर्षांपासून या समस्येने त्रस्त झालेली होती. पोटातील गोळ्याचा आकार हळूहळू वाढत गेल्याने रुग्णास प्रचंड पोटदुखीचा त्रास होऊ लागला. अखेर अतिशय क्लिष्ट अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. एका मोठ्या संकटातून मुक्तता केल्याने रूग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टर प्रदीप कुटे, डॉ .सोनाली कुटे रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.
संत तुकाराम