हा हल्ला उद्याच्या परिवर्तनाची नांदी ठरेल ; मंत्री विखे पाटील
{ येत्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकलाच पाहिजे }
संगमनेर : भारत रेघाटे
असे प्रकारचे हल्ले घडतात, ते अतिशय दुर्दैव आहे. हे प्रकार तालुक्यासाठी नवीन नाही. हल्ले करणे संगमनेर तालुक्याची परंपरा राहिलेली आहे. संगमनेर तालुका हा दहशतीचा तालुका होता. वर्षानुवर्षे या तालुक्यात दहशत सुरू ठेवण्याचे काम पू पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केले. विरोध करतो त्याचा कार्यक्रम करायचा. लोकांमध्ये दहशतवादी वातावरण निर्माण करून आपल्या पायाजवळ राहिले पाहिजे असे वातावरण निर्माण करायचे. धांदरफळच्या घटनेने तालुक्याचा आमदार बदलला. येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकी साठी शत प्रतिशत महायुतीचा भगवा फडकलाच पाहिजे. असे काम कार्यकर्त्यांना करण्याचा सल्ला देत या तालुक्यात विकासाचे पर्व आणायचे आहे असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संगमनेर येथील नवीन नगर रोडवर एका महासभेला उद्देशून विखे पाटील बोलत होते. विखे पाटील पुढे म्हणाले की, एक सर्वसामान्य कार्यकर्ता अहोरात्र आपल्यासाठी झिजत होता. या कारणाने येथील प्रस्थापित माणसाचा धोबी पछाड झाला. त्यांना हे दुःख पचवता आले नाही . लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल आपण मान्य केला पाहिजे. तुम्हाला लोकशाही मान्य नसून तुम्हाला ठोकशाही मान्य असल्याचा टोला यावेळी विखे पाटील यांनी लगावला. लोकशाही मध्ये झालेला पराभव तुम्हाला स्वस्थ बसू देत नसल्याचे ते म्हणाले . यापूर्वी कीर्तनकारावर आणि वारकरी संप्रदाय हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. आता या तालुक्यातील जनता तुमच्या विरोधात उभी राहिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

अमोल खताळ यांनी तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिलेले आहे. या तालुक्याला न भूतो न भविष्यती असे दिवस अमोल खातळ यांच्या रूपाने या तालुक्याला मिळाले. कुठे टँकर लावला नाही, कुठे वाळू माफिया ही पोसला नाही. हे आपल्या तालुक्याचे परिवर्तन आहे. आपल्या सर्वाकडे बघून माझाही हुरूप वाढल्याचे विखे पाटील यांनी सभेचे कौतुक केले. तुमच्या चुका मुळे तुम्हाला जनतेने घरी बसवल्याचेही विखे म्हणाले. तुम्ही आता लोकांच्या मनातून उतरले असल्याची जाणीव तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. कालची घटना घडलेली ती अचानक घडली नसून यामागील खरे सूत्रधार शोधले पाहिजे. अशा सूचना आपण पोलिसांना दिल्या आहेत. अमोल खताळ यांचा केस सुद्धा वाकडा होणार नाही. याची मी ग्वाही देतो .

आम्ही आमचा संयम सोडला नसून जशास तसे उत्तर देऊ असे ठणकावूनही सांगत विखे म्हणाले संगमनेर मध्ये आम्ही दहशत निर्माण करण्यासाठी आलेलो नसून संगमनेर मधील प्रत्येक घरामध्ये परिवर्तन करण्यासाठी आलो आहोत. तालुक्याचे परिवर्तन झाले पाहिजे, तालुका दुष्काळ मुक्त झाला पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे, येथील दहशतवाद संपवण्याची जबाबदारी माझी असल्याचेही विखे सांगून महायुतीचे काम हे विकासाचे काम आहे. एकीकडे दहशतवाद मोडून दुसरीकडे तालुक्यात विकासाचे पर्व आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमोल यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता तुमच्यावर असून असून तुम्ही ढाल होऊन उभे राहिले पाहिजे पुढे राहिले पाहिजे धमक्या देणाऱ्याची चौकशी झाली पाहिजे कार्यवाही झाली पाहिजे. इथे आलेला प्रत्येक माणूस हे अमोल आमदार अमोल खताळ यांच्या प्रेमापोटी आलेला आहे जनसमुदाय आहे. खताळ यांच्या प्रेमामुळेच तालुक्यात परिवर्तनाची नांदी ठरणार आहे असल्याचे विखे म्हणाले.

पोट दुखीमुळे भ्याड हल्ला ; आमदार लंघे
आमदार लंघे यांनी सभेला संबोधित करताना म्हणाले अधिवेशनामध्ये संगमनेर येथील तालुक्यातील प्रश्न खताळ यांनी अत्यंत जिव्हाळ्याने मांडले. राजकीय दोषापोटी हल्ला झाला त्याचा निषेध करतो आता महायुतीचे सरकार आलेले असून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एक वेगळी दिशा देण्याचे काम करीत असून अमोल खताळ यांनी केले पोट दुखीमुळे हा भ्याड हल्ला. केल्याचे लंघे म्हणाले खरे हल्लेखोर प्रशासनाने शोधले पाहिजे.

शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी माझा जीव नौच्छावर करेल :- खताळ
आपल्याला शहर आणि तालुक्याची शांतता भंग करायची नसून, गाव बंद करायचे नाही. आपण माघार घेण्यासाठी एक इंच सुद्धा जागेवरून हलणार नाही. असे सांगत आमदार खताळ म्हणाले, माझ्यामागे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असून कोणीही घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे खताळ म्हणाले. आभार सभेमुळे संगमनेरच्या सत्ताधाऱ्यांची पायाखालची वाळू सरकली.
जनतेने मला स्वीकारले, परंतु पराभूत उमेदवार अजूनही स्वीकारू शकत नसल्याचे शल्य आजही विरोधकांना बोचत आहे. चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आपण वाचा फोडून न्यायदान देण्याचे काम करत आहोत. आपण विकास कामे हाती घेतल्याने त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होत असल्याचे खताळ म्हणाले. आपण शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्याच्या जनतेसाठी माझा जीव निच्छोर करीन कारण या जनतेने मला न भूतो न भविष्यती असे प्रेम दिले. अशा भ्याड हल्ल्याला घाबरणारा मी पळपुटा नाही. येथील लाखो जनतेचा पाठिंबा मला आहे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागलास तर गाठ माझ्याशी असल्याचा खरमरीत इशारा अमोल खताळ यांनी विरोधकांना दिला. त्यांनी आमदार खताळ यांना हात लावला. यापुढे संगमनेर ची जनता ही दहशत मोडून काढेल ! कार्यकर्त्यां ऐवजी माझ्याशीच संघर्ष करावा लागेल असे ते म्हणाले.
यावेळी माजी शहराध्यक्ष अधिवक्ता श्रीराम गणपुले, गुलाब भोसले, शौकत जहागीरदार, आप्पा केसेकर, दिनेश फटांगरे आदि पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे , आमदार अमोल खताळसह महायुतीच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, माजी शहराध्यक्ष एड. श्रीराम गणपुले, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आप्पासाहेब केसेकर, माजी नगर सेवक अविनाश थोरात, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आर पी आयचे तालुका अध्यक्ष आशीष शेळके, एकलव्य संघटनेचे योगेश सूर्यवंशी, भाजपचे जावेद जागीरदार, शौकत जागीरदार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश काळे, आर पी आय चे कैलास कासार, माजी नगर सेवक ज्ञानेश्वर कर्पे, नीलिमा खताळ, शहराध्यक्षा पायल ताजने, माजी शहर प्रमुख रेखा गलांडे, जिल्हा प्रमुख कावेरी नवले सह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पो नि रवींद्र देशमुख, पो नि प्रवीण साळुंखे पोलीस पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आभार रमेश काळे यांनी मानले.
