ब्रेकिंग न्यूज :
भारत

ज्ञानाचा गौरव ; प्रा. विजय भोर यांना मानद डॉक्टरेट उपाधी

Blog Image
एकूण दृश्ये: 111

ज्ञानाचा गौरव ; प्रा. विजय भोर आणि डॉ. महेश पाटील यांना मानद डॉक्टरेट उपाधी

      संगमनेर : प्रतिनिधी 

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवणारे रुक्मिणी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे संस्कृत विभागाचे प्राध्यापक प्रा. विजय रोहिदास भोर यांना भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स तर्फे मानद डॉक्टरेट उपाधी प्रदान करण्यात आली आहे.

     त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून, प्रा. भोर यांच्या या यशाबद्दल मित्र परिवार आणि शिक्षणवर्तुळातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

    तसेच शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणारे शिक्षण तज्ञ डॉ. महेश पाटील यांनाही मानद डॉक्टरेट उपाधी मिळाली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव सुद्धा संगमनेर परिसरात अभिमानाने साजरा केला जात असून, दोन्ही विद्वानांचे अभिनंदन होत आहे.

----- Advertisements -----

 

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज