ब्रेकिंग न्यूज :
भारत

जिल्हा पर्यावरण समितीवर सेवाव्रती गणेश बो-हाडे यांची निवड

Blog Image
एकूण दृश्ये: 199

जिल्हा पर्यावरण समितीवर सेवाव्रती पर्यावरण मित्र गणेश बो-हाडे यांlची निवड 

   संगमनेर भारत रेघाटे

पर्यावरणा बाबत व्यापक जनजागृती करून संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सातत्याने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणी करत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात भरीव काम करणारे समाजव्रती तसेच लाडकी बहीण जिल्हा संयोजक सेवावृत्ती पर्यावरण मित्र गणेश बो-हाडे यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक कार्यालय अहिल्या नगर समिती मध्ये प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या एक सप्टेंबर 2015 च्या निर्णयानुसार या समितीची स्थापना झालेली आहे. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतात. या समितीत विविध शासकीय विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच पर्यावरण तज्ज्ञ आदि क्रियाशील व्यक्तीचा समावेश आहे. शासकीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा जनसंपर्क माहिती अधिकारी, जिल्हा वन अधिकारी, लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व आमदार, विधानसभा परिषद सदस्य, पर्यावरण तज्ज्ञ, डॉ. सुनील मस्के, डॉ. सतीश कुलकर्णी सेवाव्रती गणेश बोराडे यांच्या सोबतच सुरेश खामकर यांचीही निवड करण्यात आली.

----- Advertisements -----

या समितीची पहिली बैठक लवकरच होणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील पर्यावरण विषयक समस्यावर उपाय योजना आणि जनजागृती बाबतच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. पर्यावरणाशी व्यापक दूरदृष्टी असलेले वृक्षाच पातं, निसर्गाशी नातं, पानात फुलात रमणारे गणेश बो-हाडे हे लोकांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण सेवाव्रती व्यक्तिमत्व असलेल्या गणेश बोराडे सारखे कार्यकुशल, अनुभवी समाजव्रतीच्या या समितीतीत झालेल्रा समावेशामुळे पर्यावरण चळवळ ही अधिक गतीमान होईल अशी भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे.

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर