ब्रेकिंग न्यूज :
भारत

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

Blog Image
एकूण दृश्ये: 131

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न ; आधारचा स्नेह मेळावा पडला पार 

   संगमनेर : भारत रेघाटे

आधारचे शिलेदार शिक्षणासाठी चालू असलेल्या विवेकी संवर्धन परंपरेला पुढे नेण्याचे काम करीत असून वंचित विद्यार्था मध्ये दडलेला एक माणूस घडवण्याचे काम उभे राहत आहे. आधारची दहा रुपयाची किमया न्यारीच असल्याचे प्रतिपादन साथी भास्करराव दुर्वे नाना स्मारक समितीचे कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ अवसक यांनी केले. 

     २१ ऑगस्टला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आधार फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी, हरिभाऊ कोते, उद्योजक कार्तिक तांगडकर, माजी सैनिक सूर्यकांत घेगडमल, प्रा.आर. वाय. कमलाकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी 'चला हसू या' हा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पुरुष गटात विरेश आडेप तर स्त्रियांच्या गटात विजया मिसाळ प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल त्यांना ग्रामगीता हे पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आले. या स्नेह मेळाव्यातील ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देत सन्मानीत करण्यात आले आधारचे समन्वयक विनोद राऊत यांनी आपल्या सुरेल आवाजातील गाण्याने मंत्रमुग्ध केले. 

----- Advertisements -----

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधारचे विठ्ठल कडूसकर, देविदास गोरे, पी. डी. सोनवणे, डॉ. महादेव अरगडे, सुखदेव इल्हे, अनिल कडलग, लक्ष्मण कोते, व्यवस्थापक सोमनाथ बोऱ्हाडे यांसह आधारचे सर्व शिलेदारांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले.

आदर्श शिक्षक सोमनाथ कळसकर यांनी "आधार भवन" या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामासाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली. त्याचबरोबर रेणुका डंग यांनी ५ हजार अब्दुलहमीद शेख व दत्तात्रय बिडवे यांनी प्रत्येकी १ हजार संगीता पाटील यांनी ६७१ रुपयांची देणगी दिली.

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक