ब्रेकिंग न्यूज :
भारत

हिरवाईने नटणार औदुंबरनगरी :- दिलीप भंडारे

Blog Image
एकूण दृश्ये: 32

    🌳🌱🌳🌱🌳🌱.            हिरवाईने नटणार औदुंबरनगरी - दिलीप भंडारे

विविध वृक्षांची केली लागवड

औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने केला 9 वा वर्धापन दिन साजरा

   उमरखेड { भारत रेघाटे }

पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यप्राणी हा बुद्धिजीवी प्राणी आहे. मनुष्यास केव्हा काय पाहिजे याचे ज्ञान आहे. आपण नैसर्गिक संपत्तीचा वारेमाप वापर करीत असल्यामुळे काय परिस्थिती निर्माण होत आहे याचे ज्ञान मनुष्यास आहे. मनुष्यास तहान लागली की पाण्याची आठवण होते तसेच उन्हाळ्याची चाहूल लागली की माणसाला सावलीचे गरज भासते परंतु सावली देणारे वृक्षाची तोडीमुळे कमालीचे तापमान वाढले असून ऊन्हाच्या झळा असह्य होत आहे झळा त्यापासून संरक्षण करण्याकरिता वृक्ष लागवडी बरोबर त्याचे संवर्धन करणे काळाची गरज लक्षात घेत औदुंबर नगरीतील काही धेय्य वेड्या वृक्षप्रेमीने प्रभावी साधन असलेल्या सोशल माध्यमातून नि चर्चेतून औदुंबरनगरी करणार हिरवीगार व्हावी व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे या उद्देशाने वृक्ष लागवडी बरोबर जतन आणि संवर्धन करण्याचे मौलिक कार्य गेली नऊ वर्षापासून करीत आहे. औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने विविध जातीचे वृक्ष लागवड करत नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

समितीचे अध्यक्ष दिलीप भंडारे माहिती देताना म्हणाले की, 3 एप्रिल 2016 रोजी औदुंबर वृक्ष संवर्धन समितीची स्थापना केली. या समितीमध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व वयोगटाचे, सर्व क्षेत्रातील सदस्य आहेत. आजपर्यंत समितीने रेणुका माता देवी टेकडी, महादेव टेकडी, धोंगडे पीर टेकडी, शाळा परीसर, बुद्ध विहार, स्मशानभूमी, सरकारी दवाखाना अशा 35 अती महत्वाच्या ठिकाणी तसेच शहरातील अनेक मान्यवरांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष लावले. त्या परिसराला औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने "बर्थडे गार्डन" असे नाव दिले. प्रियजन व्यक्तीचे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृती वृक्ष स्वरूपात कायम राहाव्यात या उदात्त हेतूने त्यांच्या स्मृतीला निरंतन उजाळा मिळावा यासाठी त्यांच्या नावाने वृक्ष लागवड केली जाते त्या परिसराला "स्मृतिवन" असे नाव देण्यात आले, समितीने जागतिक महिला दिन, जागतिक पर्यावरण दिन, कारगिल विजय दिन, शिक्षक दिन, जलसंवर्धन दिन, हवामान दिन, बालक दिन, अनेक महापुरुषाच्या जयंती अशा अनेक दिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून तसेच "मियावाकी" या पद्धतीने सुद्धा वृक्षरोपण करून आजपर्यंत 10,000 वृक्ष लावण्यात आली. समिती फक्त वृक्ष लावून थांबत नसून वर्षभरात कोणत्या ना कोणत्या हेतूने 365 दिवस संवर्धनाचे कार्य करते. या कालावधीत एकही दिवस असा गेला नाही समितीचे सदस्य वृक्षापर्यंत पोहोचले नाही. 

वेगवेगळी नावे देत जपले वेगळेपण 

वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येक सदस्याच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तसेच व्यक्तीला आपल्या घरासमोर वृक्ष लागवड करून "एक घर एक वृक्ष" हा उपक्रम राबवीत असतो "आपले शहर हरित शहर" व्हावे या उद्देशाने कार्य करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाले आहे त्यानिमित्ताने "शेतकऱ्याच्या बांधावर फळ वृक्ष लागवड" या उपक्रमाच्या माध्यमातून 350 शेतकऱ्यांच्या बांधावर 350 वृक्ष विविध फळाचे वृक्ष लागवड करण्या करिता आजी-माजी सैनिकाच्या हस्ते शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर रोप वाटप करण्यात आले. या उपक्रमास शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

*पुरस्काराने झाला सन्मान*

आता पर्यंत समितीला अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, यवतमाळ जिल्ह्यातील भगीरथ पुरस्कार,भाऊसाहेब माने प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा राज्य कृषी पुरस्कार, राष्ट्रसंत रामराव महाराज पोहरादेवी पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन समितीला गौरवण्यात आल्याचे भंडारे यांनी सांगितले.

रीत असावी हरीत करणारी.         

 समितीचे सदस्य विजय रेघाटे म्हणाले की, वृक्षामुळे मानवी जीवन आहे. वृक्ष लागवडीचा वसा सर्वांनी घेतला पाहिजे. "घ्या वसा तरच वृक्षा खाली बसा. औदुंबर समितीची न्यारी आहे रीत औदुंबर नगरीला करणार हरीत" हे ब्रीद घेवून समितीचे कार्य अविरत सुरू आहे. वन सप्ताहा निमित्ताने वन महोत्सव वन संवर्धनातून जनजागृती करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

----- Advertisements -----

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी