ब्रेकिंग न्यूज :
भारत

घंटागाडी चालकाची मुजोरी! व्यावसायिकांवर शिरजोरी ; हप्ते वसुलीचा धंदा फोफावला:

Blog Image
एकूण दृश्ये: 196

घंटागाडी चालकाची मुजोरी!व्यावसायिकांवर शिरजोरी ; हप्ते वसुलीचा धंदा फोफावला: जागोजाग कच-याचे ढीग ठेकेदारही हैराण, पालिका परेशान !

    संगमनेर : ( भारत रेघाटे )

शहरात कचऱ्याच्या दुर्गंधीने आधीच नागरिक त्रस्त असताना नगर पालिकेच्या वतीने ठेका दिलेल्या घंटागाडी चालकाची मुजोरी आता टोकाला पोहोचली आहे. दिवाळीच्या नावाखाली शहरातील दुकानदार हॉटेल चालक व्यावसायिक, दुकानदार यांच्याकडून सक्तीने हप्ते वसूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे न दिल्यास कचरा उचलण्यास नकार देत, धमक्या आणि मारहाण करण्याची मजल व दादागिरी या चालकाकडून सुरू असून घंटागाडी वरील कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचा इशाराही तो देतो. कर्मचाऱ्यांनी न ऐकल्यास त्यांनाही दमदाटी करून मारहाण करण्याची भाषा या चालकाकडून आता नित्याचीच बनली आहे.

       सदर चालक शरद दत्तू पवार याने कंत्राटी ठेकेदार असलेल्या घंटागाडी चालकाने स्वतःची संघटना तयार करून मी संघटनेचा अध्यक्ष आहे, माझे काही कोणी बिघडवू शकत नाही असा दम देत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही आव्हान दिले आहे. ठेकेदारसुद्धा या हेखेखोर प्रवृत्तीच्या चालकामुळे हैराण झाले असून, उचललेला कचरा हव्या त्या ठिकाणी जमा करत तो तसाच त्याच ठिकाणी फेकल्या जातो. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधीचा त्रास वाढला असून आरोग्याचाही प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.

----- Advertisements -----

        सदर चालकाने प्रत्येक अनेक व्यवसायिकाकडून हजार दीड हजार रुपयांचे हप्ते वसूल केले असून पैसे न दिल्यास दादागिरी करत मारहाण करण्याची भाषा करतो अनेक दुकानदार हॉटेल व्यावसायिकांनी संबंधित चालकावर तात्काळ कारवाई व ठेकाच रद्द करण्याची तक्रार नगरपालिकेकडे लेखी स्वरूपात केली आहे. या प्रकारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत इशारा दिला. गुंड प्रवृत्तीचा चालक व त्याला पाठीशी घालणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईल आंदोलन करून न्याय मिळवेल.

      संगमनेरचा कचरा प्रश्न हा आता फक्त दुर्गंधीसह नगर पालिकेतील  बेजबाबदारपणा आणि ठेकेदारांच्या अकार्यक्षमतेचा जिवंत पुरावा बनला आहे.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम