गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या दोघांना अटक; आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील
संगमनेर [ प्रतिनिधी ]
शहरातील महात्मा फुले शाळा ते घुलेवाडी परिसरात गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या दोघांना संगमनेर शहर पोलीस पथकाने अटक केली आहे. या शहरासह ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली.
गुरुवार दि. 29 मे रोजी रात्री 1 च्या सुमारास पोलीस निरीक्षक देशमुख यांना माहिती मिळाली की, दोघे जण संशयितरित्या फिरत आहेत. या प्रकरणी देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली असता, या रोडवर शेख मुजम्मील, शेख मजिद, वय 22 वर्षे, रा वाणी मुस्लमान बौध्दवाडा, जमुना, ता. खामगाव, जिल्हा बुलडाणा आणि जमीरखान नजीरखान वय 40 वर्षे रा. मिलन कॉलनी, ता. खामगाव, जिल्हा बुलढाणा हे दोघे अधांरात सशंयीतरित्या फिरताना दिसुन आले. पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस करीत झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील 50 हजार रुपये किमंतीचा सिल्व्हर रंगाचा आणि लोखंडी मॅगझीन असलेले गावठी पिस्तुल, एक मोबाईल, तसेच एक बंद पडलेला मोबाईल असा एकूण 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

दरम्यान या प्रकरणी दोन्ही आरोपीना अटक केली असून त्यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर आरोपीवर शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (एक )(तीन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, रावसाहेब लोखंडे, रामकिसन मुकरे,, अतुल उंडे, अजित कुर्हे सोपान बाचकर साईनाथ पवार आदी पोलीस पथकाने केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहेत.

