ब्रेकिंग न्यूज :
भारत

ग्रामीण भाग आता वीज विकासाच्या नव्या टप्प्यावर ;

Blog Image
एकूण दृश्ये: 40

ग्रामीण भाग आता वीज विकासाच्या नव्या टप्प्यावर ; तालुक्यातील १८ गावांना नवी ऊर्जा! आ. तांबेंच्या प्रयत्नाने पडणार लख्ख प्रकाश ; दीड कोटींचा निधी मंजूर मंत्री विखे पाटलांचे मानले आभार 

    संगमनेर ( भारत रेघाटे )

तालुक्यातील ग्रामीण भाग आता वीज विकासाच्या नव्या टप्प्यावर येणार असून आमदार सत्यजीत तांबे यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत, तब्बल १८ गावांसाठी ट्रान्सफॉर्मरला दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्थिर, अखंड आणि सक्षम वीजपुरवठा मिळणार असून शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे.

      या गावांचा समावेश 

अंभोरे, कुंभारवाडी, कोळवडे, घुलेवाडी, जाखोरी, जोर्वे, डिग्रस, तळेगाव, नांदुरी दुमाला, मांडवे बु., मालुंजे, रणखांब वाडी, राजापूर वरवंडी ,जनतानगर, हिवरगाव पावसा, मालुंजे आणि संगमनेर खुर्द अशा एकूण १८ गावांचा समावेश आहे.

     आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे वीजदाब व खंडित पुरवठ्याचा शेवट होणार असून ग्रामीण भागातही लख्ख प्रकाश पडणार आहे. या भागातील शेतकरी आणि नागरिकांना अनेक वर्षांपासून कमी वीजदाब, खंडित पुरवठा आणि सिंचनातील अडथळे यांचा सामना करावा लागत होता. या तक्रारींचा गंभीरपणे पाठपुरावा करत आमदार तांबे यांनी अखेर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. तांबे म्हणाले संगमनेर तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम व्हावा, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध व्हावी आणि नागरिकांना अखंड सेवा मिळावी हा आमचा प्रयत्न आहे, या निधीबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही त्यांनी आभार मानले.

  जनतेसाठीच विकास

आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रत्येक गावाची समस्या ऐकून घेत, सातत्याने प्रयत्न केले आणि अखेर दीड कोटींचा निधी मंजूर करून आणला. हा निर्णय म्हणजे जनतेसाठीचा विकास कृतीतून सिद्ध केलेले नेतृत्व. या निधीमुळे संगमनेर तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाचा वेग नव्या उंचीवर पोहोचेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

----- Advertisements -----

 

 

 

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin