फ्लिम इंडस्ट्रीत दिले दिग्गजांना फिटनेसचे ट्रेनिंग ;संगमनेरकरांच्या सेवेत मसल मॅजिक जिम; 35 युवकांना केले सम्मानित
संगमनेर { भारत रेघाटे }
आरोग्या बाबत युवकांनी जागरूक राहिले पाहिजे. आपली शक्ती मजबूत आणि विचार पक्के झाले पाहिजे. शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्यास तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. शारीरिक शक्तीसाठी व्यायाम आणि फिटनेस महत्वपूर्ण असून नियमित व्यायाम व शारीरिक गतिविधी यास प्राथमिकता देणे गरजेचे आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे असे मत अँग्लो उर्दू चे ट्रस्टी अब्दुल्ला चौधरी यांनी व्यक्त केले .

बीबी सारा उमर सय्यद महिला सेवा शक्ती फौंऊडेशन आणि मसल मॅजिक जिम च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली तीन वर्षा पासून संगमनेर करांच्या सेवेत मसल मॅजिक जिम आरोग्या बाबत जागृती करीत आहे. या ठिकाणी अनेक युवक आपले भविष्य घडवीत आहेत. मान्यवरांच्या हस्ते 35 युवकांना गोल्ड मेडल, आणि ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गनी हाजी शेख ,अंगलो उर्दू हायस्कूलचे ट्रस्टी अब्दुल्ला चौधरी, जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटरचे इद्रीस शेख असिफ अली सय्यद, इसाक खान, रिजवान मंत्री,मतीन भाई ,युसूफ भाई जिम चे प्रमुख इम्तियाज नाझीर आदि उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. दानिश म्हणाले की, कसरत जीवनात फायदेशीर आहे. पण जर आरोग्य नसेल तर काहीही उपयोग नाही. फिटनेस मध्ये जागरूकता झाली पाहिजे. आजकाल मुले मोबाईल फोनमुळे त्यांचे आरोग्य खराब करीत आहेत. त्यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.

जावेद उमर शेख म्हणाले की, युवकांना यश मिळवायचे असेल तर आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य चांगले असेंबल तरच तुम्ही आव्हानांवर मात करू शकता. तुमच्या आवडीचा पाठलाग सोडू नका. तुम्हाला काहीतरी वेगळे करावे लागेल, तीच तुमची प्रेरणा बनेल असा सल्ला जावेद उमर शेख यांनी दिला. कार्यक्रमाचे उत्तम संयोजन करण्यात आले होते.

कोण आहेत इम्तियाज नाझीर ?
इम्तियाज नाझीर हे स्वतः आरोग्या बाबत सजग असून मसल मॅजिक जीमच्या मध्यमातून युवाकाना घडवत आहेत. गेली वीस वर्षापासून बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात ते सक्रिय कार्यरत आहेत. फ्लिम इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांना फिटनेस आणि आरोग्या बाबत महत्त्वपूर्ण ट्रेनिंग दिली. इम्तियाज नाजीर हे बॉडी बिल्डिग मधील एक राष्ट्रीय खेळाडू असून त्यांना मिस्टर इंडिया 1 सुवर्णपदक, 4 रौप्य 3 कांस्य पदक मिळाली असून "महाराष्ट्र श्री" महाराष्ट्र विजेतेपद उपविजेते पद ही देण्यात आले. याच बरोबर 6 सुवर्ण पदके, 4 रौप्य पदके,1 कांस्य पदक प्राप्त केली असून मिस्टर एशिया स्पर्धेसाठी दोन वेळा त्यांची निवड झाली. सेलिब्रिटी ट्रेनर सुनील शेट्टी, हिमेश रेशमिया, अजय देवगण, अहान शेट्टी, सोनू निगम, शरद केळकर, राजकुमार नरुला आणि अनेक टीव्ही कलाकार दिग्दर्शक आणि निर्माते याच बरोबरच छोट्या पडद्यावरील काही अभिनेते, डायरेक्टर, प्रोडूसर यांनाही अत्यंत मोलाची ट्रेनिंग दिली .

