ब्रेकिंग न्यूज :
भारत

"फ्लेक्स निर्माण करतात शहरात क्लेश"

Blog Image
एकूण दृश्ये: 372

नागरिक म्हणतात संगमनेर मधील वाढती विकृती चिंताजनक ! जाती धर्माच्या नावावर विकृत प्रवृत्ती फोफावतेय ! सुसंस्कृत संगमनेरला बदनाम करणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा.

     संगमनेर { भारत रेघाटे } महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराची ओळख राज्यामध्ये शांतता, सुरक्षितता, शैक्षणिक आणि प्रगतशील शहर म्हणून आहे. मात्र मागील काही महिन्या पासून विघातक प्रवृत्तींनी डोके वर काढले असून संगमनेरातील शांतता भंग करण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत. माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे नागपंचमीचे शुभेच्छा फलक फाडून विकृत प्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढले आहे.

संगमनेर हे शैक्षणिक, सहकार, व्यापार, समृद्ध बाजारपेठ,सुरक्षित शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पायाभूत विकासाच्या सुविधा राबवताना संगमनेरला वैभवशाली बनवले. याचबरोबर हायटेक बस स्थानक,विविध वैभवशाली इमारती, निर्माण केल्या. शिक्षणाचे केंद्र म्हणून संगमनेर उभे राहिले. मेडिकल हब तयार झाले. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख निर्माण झाली. व्यापाऱ्यांची व नागरिकांची विश्वासार्हता हे संगमनेरचे वैशिष्ट्य राहिले.

मात्र मागील आठ महिन्यांपासून काही विकृत प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. हायटेक बस स्थानकाच्या परिसरामध्ये फ्लेक्स बाजी ने कहर केला असून यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. याबाबत सामान्य नागरिकांनी सातत्याने आवाज उठवला आहे. आठ महिन्यांपासून काही राजकीय पक्षांचे फ्लेक्स संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज या हॅपी हायवेवर लोमकळत पडले आहे. त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दोन दिवसांपूर्वी वडगाव पान परिसरामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छांचा फलकाची काही विकृत प्रवृत्तींनी छेडछाड केली होती. यानंतर संगमनेर तालुक्यामध्ये वातावरण तापले. अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे म्हणाले की, आज पुन्हा स्वामी समर्थ मंदिराजवळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ.सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, यांच्या शुभेच्छांचा फलक काही विकृत लोकांनी फाडून खराब केला आहे. संगमनेर कोणत्या दिशेकडे चालले आहे याची चिंता आता संगमनेरातील नागरिकांना अस्वस्थ करीत आहे. यापूर्वी खराब वातावरण कधीही नव्हते. मात्र विकृत प्रवृत्तींना पाठीशी घातल्यानेच ते फोपावत चालले आहे. या वाईट घटनेचा संगमनेरातील तमाम नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून हे कोण करत आहे ते सर्वांना माहिती आहे. याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा संगमनेर मध्ये होणाऱ्या भव्य आंदोलना स्थानिक प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिवटे यांनी दिला.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे. नागपंचमीनिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुभेच्छांचा फलक लावला होता. मात्र काही विकृत प्रवृत्तीने हा फलक खराब केल्याने रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक,मेन रोड, बाजारपेठ, नवीन नगर रोड आणि संगमनेर शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. संगमनेरात अशांतता निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढावे अशी मागणी संगमनेर मधील तमाम स्वाभिमानी नागरिक व महिलांनी केली आहे.

----- Advertisements -----

शहर युवा कांग्रेसचे निखिल पापड़ेजा म्हणतात की, द्वेष करण्यासाठी फ्लेक्स हे माध्यम होऊ शकत नाही. कोणीही पोस्टर फाडू नये. अशा विकृत भावनेतून सामाजिक असंतोष वाढला जातो. सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासणारा हा प्रकार असून बोर्ड फाडून यातून काहीच साध्य होत नाही. राजकारण हे तत्वनिष्ठ असावे. लोकांना असला खोडसाळपणा आवडत नसतो. खरंतर शहर विकासासाठी पुढे आले पाहिजे. असले अनुचित प्रकार कोणीच करू नये असे निखिल पापडेजा म्हणाले. 

फ्लेक्स बाबत प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे म्हणाले की, संगमनेर शहरातली राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर जात असून कार्यकर्त्यां मध्ये शिस्त राहिलेली नाही आम्ही शिस्तीचे राजकारण केले. मी विरोधक असताना 40 वर्षांमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल अपशब्द कधीही काढले नाही. विरोध कायम राहील .संघ शिस्त शिकवते, ती पाळलीच पाहिजे.

"कोणत्याही पक्षाच्या फ्लेक्स बाबत असे घडू नये. या घटनेतून विरुद्ध वृत्ती मात्र दिसून येते. घटनेचा तपास केलाच पाहिजे. कदाचित गुन्हे दाखल झाल्यामुळे असे प्रकार घडू शकतात. परंतु या घटनेमुळे समाजातील वातावरण दूषित होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. आपल्याच सणाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. कुरघोडी कोणी करू नये असे बीजेपी शहराध्यक्ष पायल ताजने म्हणाल्या.

फ्लेक्स निर्माण करतात शहरात क्लेश"                                          घडलेल्या प्रकारा बाबत नागरिक म्हणतात, पोस्टर वेळेत लावले पाहिजे. वेळेतच काढले गेले तर अशा विकृत गोष्टी घडणारच नाही. त्यास आळा बसेल .वाढता वाढता वाढे ! थांबता, थांबता न थांबे ! असेच काहीसे विपरीत घडत आहे. असाच काहीसा प्रकार आता दिसून येत आहे. विकृत प्रवृत्ती ही नेहमीच शांतता भंग करत असते. फ्लेक्स वार च्या घटना डबल वार नव्हे तर वारंवार घडत आहेत. हे  कोणतेही सुसंस्कृत पणाचे लक्षण नाही. असे आता नागरिकच म्हणू लागले असून असे सातत्याने घडत असेल तर राजकीय फ्लेक्सला परवानगी द्यावी का ? असा थेट सवालच नागरिक करत आहे. या घटनेने शहरातील वातावरण दूषित होत असून यास प्रतिबंध हाच एक मेव रामबाण उपाय ठरेल. असे झाले तर पोलीसाचे हेडेक कमी होईल. हा कलुषित प्रकार किती दिवस चालणार ? बेदखलची कोण दखल कोण घेणार ? दोन्ही कडील राजकीय व्यक्ती ह्या समाज वलयांकित आहेत. त्यांच्या बाबतीत असे प्रकार घडूच नयेत. आज्ञाता मधूनच खेळ होत असला तरी शहराचा मात्र ताळमेळ ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. एकूणच फ्लेक्स वार हा येणा-या निवडणुकीवर पलटवर ठरू नये यासाठी दोन्हीकडच्या राजकीय व्यक्तीमत्वांनी या बाबत  आत्मपरीक्षण करावे अशी भावना जनसामान्य नागरिकातून व्यक्त होतांना दिसून येत आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर