ब्रेकिंग न्यूज :
भारत

फक्त बर्र च टाकली ! का बरं नाही टाकले डांबर ?

Blog Image
एकूण दृश्ये: 163

फक्त बर्र च टाकली ! का बरं, नाही टाकले डांबर ?

पालक आणि विचारतात विद्यार्थी ; अजून किती पडणार धारातीर्थी 

कोणी नाही इथे आता दक्ष          आमदार तुम्हीच घाला लक्ष 

    संगमनेर { भारत रेघाटे }

शहर, उपनगर, शाळा, गल्ली बोळातील सर्वच रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पुरती वाट लागली आहे. एकही रस्ता धड नाही. वळणा वळणावर पडले खड्डे पालक ,विद्यार्थी चांगलेच वैतागले असून विद्यार्थी, पालक, आम जन प्रतिक्रिया देताना ढिसाळ कारभारावर आपल्या शब्दातून टीकेची झोंड उठवत प्रशासनाच्या डोळ्यात मात्र झणझणीत अंजन घालताना दिसून येते.

विद्यार्थी म्हणतात, कामात काहीच नाही त्या अर्थ । किती वाट बघणार तुम्ही अजुन घडण्या अनर्थ ।

भारत माता चौक, बीएड चौक किती घेणार बळी । कशाला वाट बघता दुसरा  अजून जाण्या बळी ।

----- Advertisements -----

कोण देतं कोण घेतं ठेके काळजाचे चुकतात ठोके। पालिका असेल असेल पी डब्लू डी धडधडत जातात एक नव्हे अनेक गाडी

सतत केली‌ जाते इथे रस्त्याची तात्पुरती मलम पट्टी । दवाखाने घरचे थोडीच आहे करून घेवू  बैंडेज पट्टी।

बघा जावून एकदा बाजार पेठ वाहने लावता आडवी तिडवी। खड्ड्यांमुळे चालकांची होते गळाभेट  होते अरेरावी ।

----- Advertisements -----

शारदा शाळा, दिगंबर सराफ जवळचे बुजवले खड्डे । झाले सपाटीकरण उखडले खडीकरण द्या एकदा थेट भेट।                     

भारत चौक पोष्ट जवळ लावा की लुकलुकता सिग्नल वा रोधक। बेशिस्त झाले चालक कोणीच नाही त्यांना मालक ।

वळणावरही झाली आता वेगवान वाहनांची गती । रोडरोमीओ सभोवती, रोखा गतिरोधक लावून त्यांची गती।

वाकड्या वळणारावर मोबाईल धारकांच्या वाकड्या माना। आमदार साहेब शहरातील। मर्म तुम्हीच आता जाना ।

----- Advertisements -----

वळणाला नाही राहिली कोणतीच मर्यादा । ट्रिपल चौबल वेडीवाकडी वळणे घेत गाडी नेतो दादा ।

कोण कुठे घेतो सांगत नाही वळण। इकडे तिकडे रस्त्या रस्त्याची मात्र झाली चाळण।

गाव तसं आपले मस्त राव          लोकाचे नखरेच लय वाढले राव।

----- Advertisements -----

जात असेल किती खोक्याचा निधी, खड्यात गेला लाखोंचा निधी, कोणी केला भक्ष ।                     

आमदार साहेब तुम्हीच आहात तालुक्याचे प्रतिनिधी थोडं इकडे घाला लक्ष।

शिकत रहा, कारण ज्ञान हेच आपले खरे सामर्थ्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर