ब्रेकिंग न्यूज :
भारत

एसीबी ची धडक कारवाई ; कार, दुचाकी रोख रकमेसह 3 लाख 81 हजाराचा माल जप्त

Blog Image
एकूण दृश्ये: 74

एलसीबी ची धडक कारवाई ; कार, दुचाकी रोख रकमेसह 3 लाख 81 हजाराचा माल जप्त      

 संगमनेर: प्रतिनिधी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची संगमनेर मध्ये धडाकेबाज कारवाई तीन गुन्हे दाखल वेदांत वाईन शॉप ही अडचणीत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार 1 ऑक्टोबर अवैध दारू वाहतूक विरोधात मोहीम राबवत वेगवेगळ्या कारवाईमध्ये पाच आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या धड्यात कारवाईत पोलिसांनी एका वाहनांसह तब्बल 3 लाख 81 हजार 460 रुपयाची किमतीची विदेशी आणि देशी दारू ती वाहतूक करताना दोन वाहने जप्त केली आहेत.

          अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील गणेश लोंढे बाळासाहेब गुंजाळ, संतोष खैरे, राहुल डोके यांनी कारवाई करत मुद्दे माल हस्तगत केला आहे. अवैद्य पुरवठा व विक्री केल्याबद्दल वेदांत वाईनच्या मालकावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. होलसेल विक्री करण्याची परवानगी नसताना दारू विकल्याचे उघड झाल्याने सदरची कार्यवाही करण्यात आली. तसेच अल्टो कार मधून दारूची विक्री करतांना खैरे यांनी बुधवारी संगमनेर येथे घुलेवाडी रोडवर एका हॉटेल समोर सापळा रचून सदू जगन्नाथ मोरे (56) जवळे कडलग यास बेकायदा दारूची विक्री करताना आढळून आला त्याच्याकडून 7,240 कारसह तीन लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींनी ही दारू वेदांत वाईन शॉप मधून खरेदी केल्याची कबुली दिली त्यामुळे सदू मोरे आणि वेदांत वाईन शॉप चा मालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रामनाथ चांगदेव शिरसाठ (45) ढोलवाडी उमेश आनंद सदा (31) बिहार हे अवैद्य देशी ची विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आले त्यांच्याकडून 66 हजार 380 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 132 केवी परिसरात लोंढे यांनी संतोष अर्जुन खरात (36) यास ताब्यात घेत 7,840 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष खरात यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषोत्तम केशव धात्रक अशोक चौक यांच्याकडून 2,700 रुपये रोख तर अर्जुन रूपचंद पवार नवघर गल्ली यांच्याकडून 2,500 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त आरोपींना विनापरवाना बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि विक्री करताना पकडण्यात आले असून शहर पोलीस तपास करीत आहे.

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin