अक्षरशिल्प पामा इंडिया अबॅकस अँड ॲरीथमॅटीक रिजनल कॉम्पिटिशन स्पर्धेत . डेरे स्कूल व जूनियर कॉलेजची बाजी
संगमनेर : प्रतिनिधी
अक्षरशिल्प पामा इंडिया अबॅकस अँड ॲरीथमॅटीक रिजनल कॉम्पिटिशन २०२५ या स्पर्धेत डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडियम स्कूल व जूनियर कॉलेज,च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तब्बल ३९ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सदर स्पर्धा मालपाणी लॉन्स येथे नुकतीच पार पडली. यापूर्वी नवी मुंबई येथे झालेल्या मेंटल मॅथ्स वर्ल्ड चॅम्पियन शिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला शाळेचा विद्यार्थी देवांग पठाडे याने 100 डॉलर्स चे बक्षीस मिळवले व मलेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल पामा ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये त्याची निवड झाली आहे.
शाळेतील विद्यार्थी देवांग पठाडे, आर्या झावरे, यथार्थ शुक्ला, हसनैन सय्यद, दूर्वा प्रचंडे, यांनी चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन या गटात तर ऋग्वेद कानवडे, प्रत्यूष थोरात, दक्ष भरीतकर, अंकिता झावरे, करण ढोमसे यांनी चॅम्पियन स्टुडंट्स या गटात बक्षिसे पटकावली.
कृष्णा थोरात, पूर्वी साळवे, अद्वैत आचारी, ऋषभ इंदुलकर, धानी पुरोहित, अमृता लेनेकर, सिद्धार्थ वाकचौरे, वृंदा पुंड या विद्यार्थ्यांनी फर्स्ट रँक मिळवली तर अथर्व मोरे, पुष्कर पेढेकर, अलोक थोरात, अनुष्का कोल्हापूरे, अंश सोर, ध्रुविका अग्रवाल, सिद्धी अग्रवाल, यांनी सेकंड रँक मिळवली. श्लोक कर्डिले, प्रेम मुके, आराध्या पुंड, रिद्धिश अनाप, तनिष्का अनाप, आश्रय मैड, ईश्वरी श्रीखंडे, रिद्धी उनवणे, सृष्टी मंदिरे या विद्यार्थ्यांनी थर्ड रँक मिळवली.
जयेश थिटमे, युवराज डोंगरे, शांभवी मुटके, बतूत सिद्दिकी, ओवी ताजने यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांची तयारी शिक्षिका मंगल कानवडे मॅडम, वर्षा दारोळे , प्रिन्सिपल मिश्रा यांनी करून घेतली होती.
