ब्रेकिंग न्यूज :
भारत

चिन्ह वाटपात विलंब; निवडणूक आयोगावर नाराजी

Blog Image
एकूण दृश्ये: 192

चिन्ह वाटपात विलंब; निवडणूक आयोगाने अन्याय केल्याचा अपक्ष उमेदवार योगेश बिचकर यांचा आक्षेप

   संगमनेर ( प्रतिनिधी ) 

         स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अद्याप अपक्ष उमेदवाराला चिन्हाचे वाटप झाले नसल्याने अपक्ष उमेदवार निवडणूक आयोगा बाबत नाराजी व्यक्त करत आमच्यावर अन्याय केला असल्याचा आक्षेप अपक्ष उमेदवार योगेश बिचकर यांनी घेतला आहे. 

     संगमनेर नगरपालिकेची निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून अद्याप अपक्ष उमेदवाराला चिन्ह वाटप झाले नसल्याने प्रभाग क्रमांक १३ मधील अपक्ष उमेदवार योगेश वसंत बिचकर यांनी चिन्ह वाटपातील विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. बिचकर म्हणाले की, प्रस्थापित पक्षांना अधिकृत चिन्हे मिळाल्याने त्यांचा प्रचार जोमात सुरू आहे; मात्र अपक्षांना अद्याप चिन्ह न मिळाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. फक्त ३–४ दिवसांच्या प्रचारात मतदारांपर्यंत चिन्ह कसे पोहोचवायचे ? हा तर अपक्षांवरील सरळ अन्याय आहे असा सवाल बिचकर यांनी उपस्थित केला आहे. 

     निवडणूक प्रक्रिया अर्ज, छाननी व माघारी यातच अनेक दिवस गेले असून प्रचारासाठी वेळ अपुरा पडत असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक पुढे ढकलावी किंवा अपक्ष उमेदवारांना प्रचारा करिता मुदतीत वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

----- Advertisements -----

     याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अरुण उंडे यांच्याशी संपर्क साधला असता उद्या अपक्षांना अकरानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार असून प्राधान्य क्रमांकाने त्या त्या अपक्ष उमेदवारास या चिन्हाची पूर्तता केली जाईल अपक्षाना काही मत मांडायचे असल्यास त्यांनी पत्रव्यवहार करावा असेही ते म्हणाले.

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी