ब्रेकिंग न्यूज :
भारत

चिमुकल्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला ; प्रकृती स्थिर ,दैव बलवत्तर, वाचले प्राण

Blog Image
एकूण दृश्ये: 116

चिमुकल्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला ; प्रकृती स्थिर, दैव बलवत्तर, वाचले प्राण

   संगमनेर : प्रतिनिधी 

संगमनेर तालुक्यात बिबट्याची दहशत ही नित्याचीच बाब बनली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यास वन विभाग कुठेतरी कमी पडत असल्याने तसेच बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक किती काळजी घेणार ? वन विभाग आणि प्रशासनाने यावर तातडीने उपाय योजना कराव्या अशु मागणी जोर धरत आहे.

तालुक्यातील शेडगाव येथे एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत या मुलास गंभीर जखमी केले घटना समजतात आई आजी आणि इतरांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने त्या मुलाला तिथेच सोडून धूम ठोकली.आई, आजी, मामा समवेत घास कापण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी घडली या घटनेने पंचक्रोशीत बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली असून दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांनी प्रशासन आणि वन विभागा बाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शेडगाव येथील लहानु फड यांच्या सुनबाई भारती फड या गुरुवारी सायंकाळी घास आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत आई सिंधूबाई नागरे व भाऊ शुभम नागरे यांच्यासह चार वर्षाचा श्रीधर हा त्याच्या शेजारी खेळात होता. जवळच शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या खेळत असलेल्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला करत त्याला ऊसात उचलून नेले. त्यामुळे चिमुकल्याला वाचवण्यासाठी आई भारती, आजी सिंधूबाई जिवांच्या आकांताने बिबट्याच्या मागे ऊसाच्या दिशेने पळाल्या. बिबट्याने चिमुकल्याला तिथेच सोडून धूम ठोकली यादुर्घटनेत चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली होती. मामा शुभम याने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

----- Advertisements -----

दरम्यान मुलगा गंभीर जाखमी झाली असून त्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत. प्रकृती आता स्थिर आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत असून तात्काळ परिसरात याबाबत उपाययोजना राबवाव्यात असेही नागरिकांनी सांगितले.

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin