बापरे पोलिसांनी घेतले चोरट्या कडून, चार लाखांचे महागडे मोबाईल ; अन् केले परत ; वनप्लस, रियल मी, नोटो, मोटो, ओपोचा समावेश
संगमनेर : भारत रेघाटे
चोरीला गेलेले, हात चलाखीने अथवा गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात असताना, दुचाकी वर असताना अनेक चोरटे आपले मोबाईल उडवून पसार होतात. असाच प्रकार संगमनेर शहर आणि तालुक्यात घडला असून तब्बल चार लाखाचे महागडे मोबाईल मोबाईल चोरट्यांनी लंपास केले त्याचा शोध घेत पोलिसांनी चोराकडून मोबाईल घेत मूळ मालकाला ते मोबाईल परतही केले.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील एक वर्षाच्या कालावधीतील चोरीला गेलेले, गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शहर पोलिसांनी शोध घेत चोरट्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसाला यश आले.

सदरचे मोबाईल हे विवो, ओपो, मोटो, . नोरो, वनप्लस, रेलमी महागड्या कंपनीचे असुन तब्बल २० मोबाईलचा छडा पोलिसांनी लावला असून ३,९६,०००/- जवळपास चार लाख किमतीचे मोबाईल हे मुळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, शहर पोलीस उप-निरीक्षक समीर अभंग, पोकों शिरसाठ, सोनवणे, नागरे, मुकरे,,खुळे, मोरे, बाचकर,उंडे या पथकाने स्टींग करत अथक परिश्रम घेवुन शोध लावल्याने शोध पथकाचे मोबाईल परत मिळाल्याने आभार मानले.
