ब्रेकिंग न्यूज :
भारत

बँक ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि खोटी बातमी ; थांबा ! धनादेश टाकता, चेक करा

Blog Image
एकूण दृश्ये: 127

बँक ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि खोटी बातमी ; थांबा ! धनादेश टाकता, चेक करा

     संगमनेर : ( भारत रेघाटे )

आर्थिक व्यवहार सुरळीत, झटपट तसेच फसवणुकीचे प्रकार थांबवण्यासाठी आरबीआय ने काही चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या प्रणालीच्या घोळातूनच नागरिकांना ऐन दिवाळीत त्रास सहन करण्याची वेळ आल्याने धनाचा आदेश न आल्याने तसेच 'लक्ष्मी' वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेकांना या दिवाळीत लक्ष्मी पूजनाचाही आनंद घेता आला नाही. एकूणच चेक क्लिअरन्सची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याने अनेक ग्राहकांना "हायसे" वाटले असले तरी ऐन दिवाळीत ही प्रक्रियाच थंडावल्याने बँकेत असूनही "नाय से" असेच काही से झाले. 

           ४ ऑक्टोबर पासून चेक क्लिअरन्सची प्रक्रिया वेगाने होईल असे बोलले जात होते. कारण चेक जमा केल्यावर काही तासांतच रक्कम खात्यात जमा होईल. येणारी नवीन प्रणाली अत्याधुनिक आणि सोयीची म्हणून ओळखली जाते. या प्रणालीमुळे चेक बाऊन्स होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही मानले जाते. परंतु करायले गेले काय ? अन् झाले काय ! असाच प्रश्न आता ग्राहका समोर उभा राहिलेला दिसून येतो. सदर प्रणाली सुरू होण्यासाठी किती दिवस लागतील याबाबत तुर्तास कोणीही बोलायला तयार नाही.

      ४ आक्टोंबर २०२५ पासून बँक ग्राहकांना नवीन आदेशाने पार्टीचा धनादेश २४ तासात म्हणजे त्याच दिवशीच क्लिअरिंग होणार असून ग्राहकाचे पैसे तात्काळ खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी बँकिंग प्रणाली मध्ये अनेक त्रुटी तशाच शिल्लक राहिल्याने धनादेशही तसेच बँकेत पडून राहत असल्याने खातेदार, ग्राहकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

----- Advertisements -----

     या निर्णयामुळे संपूर्ण बँकिंग प्रणालीमध्ये समाधानकारक कार्यक्षम पद्धतीने लवकर पैसे मिळणार असल्याचा दावा अखेर फोल ठरला. दिवाळीत अनेक नागरिकांचा धनादेश पास न झाल्याने दिवाळी साजरी करण्यावर एकप्रकारे विरजण पडले. या बेजबाबदार व्यवस्थेमुळे नागरिकांनी बँकिंग क्षेत्राबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    ४ ऑक्टोबरपासून धनादेश वटण्याची प्रक्रिया बदलणार असल्याचे बोलले जात होते उलट टाकलेले धनादेश 24 तासाच्या ऐवजी 24 दिवस उलटूनही अनेक ग्राहकाचे पैसे जमा न झाल्याने ग्राहकांना हिरमोड सहन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तर दुसरीकडे मात्र धनादेश जसे जमा होतील, तसे ते वटवले जातील. यामुळे धनादेशाद्वारे होणारे व्यवहार जलद होतील. ही नवीन प्रणाली जानेवारी २०२६ पर्यंत दोन टप्प्यांत लागू केली जाणार आहे . परंतु पहिल्या महिन्यातच पहिल्या टप्प्यातील बँकिंग व्यवस्थापनाचा खराब अनुभव आल्याने नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहाराबाबत असंतोष पसरल्याचे दिसून आले.

एवढेच नव्हे तर आर्थिक व्यवहार अधिक वेगवान होतील असा दावा करण्यात आला होता अखेर तो ही फोल ठरला. बँकेत धनादेश जमा झाल्यावर तो लगेचच वटवला जाणार होता यामुळे ग्राहकांना पैशांसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. परंतु प्रत्यक्षात धनादेशाचे पेमेंट जलद गतीने होण्याऐवजी एकूण बँकिंग प्रक्रियेतील धोरणामुळे 24 तासाच्या ऐवजी आता किती-ही दिवस लागतील हे सांगणेच अवघड होवून बसले आहे.

   चेक  (धनादेश) वठवण्याची प्रक्रिया बँकेच्या विशिष्ट अशा प्रणालीतून त्याची नोंद केली जाते. तद्नंतर आर्थिक व्यवहारांची पूर्तता केली जाते. परंतु या नवीन धनादेश क्लेअरिंग प्रक्रियेत बँक कर्मचारी सुद्धा हातबल झाले असून ग्राहकाचे धनादेश पास न झाल्यामुळे ग्राहकाच्या प्रत्येक प्रश्नाला कर्मचाऱ्यांना उत्तरे द्यावे लागत आहे. यामुळे कर्मचारी सुद्धा प्रचंड तणावात आहेत. स्पॉन्सर असलेल्या बँकेच्या माध्यमातून या आर्थिक व्यवहाराची पूर्तता केल्या जाते यामध्ये ग्राहकाने दिलेल्या चेक वठले नसल्याने धनादेश देणा-या पार्टीचा बऱ्यापैकी फायदा झाल्याचेही दिसून आला. ज्यांनी चेक भरले ते वठले नसल्याने रिटर्न जाण्याचा प्रश्नच येत नाही.

एकूणच सिस्टिमचा ताळमेळ बसत नसल्याने धनादेश क्लिअर होण्यास अनेक अडचणी येत असल्याने चेक कधी जमा होईल याची शाश्वती बँकही देऊ शकत नसल्याने नागरिक आणि ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

----- Advertisements -----

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ