ब्रेकिंग न्यूज :
भारत

भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी अबॅकस हे दमदार पाऊल ; माजी मंत्री थोरात

Blog Image
एकूण दृश्ये: 413

भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी अबॅकस हे दमदार पाऊल ; माजी मंत्री थोरात.                             

 { राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत यशस्वी विकास जगताप प्रथम }             

पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

     संगमनेर : भारत रेघाटे

बाल वयातच अबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये घडणारे सकारात्मक बदल , त्यांची वाढती एकाग्रता , आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकर्षाने जाणवते. हे यशस्वी विद्यार्थी म्हणजेच उज्ज्वल उद्याच्या भविष्याची दमदार पावले आहेत असे मत माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

    अहिल्यानगर जिल्ह्याच्यावतीने 35 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन विघ्नहर्ता लॉन्स , संगमनेर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर प्रमुख पाहुणे म्हणून एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, अकोले येथील गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुणे, कृषी सल्लागार प्रमोद देशमुख आदि उपस्थित होते. 

----- Advertisements -----

एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, यशस्वी विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांच्या मेहनतीत असून उद्याचे जग उभे राहणार आहे.  आपल्या आत्मविश्वासात सर्व दडलेले आहे. सहभागी झालेले विद्यार्थी आणि त्यामधून क्रमांक मिळविलेले यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज ठामपणे दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या.

   या स्पर्धेमध्ये यशस्वी ज्योती विकास जगताप हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. यापूर्वी यशस्वीने विविध स्पर्धांमधून सहभागी होत अनेक बक्षीस आणि सन्मान मिळवलेले आहेत. त्यामुळे विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यशस्वीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.

      विद्यार्थ्यांची गणितातील आवड तसेच गणित विषयातील गती वाढविण्यासाठी वर्षातून दोन वेळा ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये संगमनेर, अकोले, ब्राह्मणवाडा, जुन्नर, नारायणगाव मंचरसह संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी सहभागी झाले होते. एवरेस्ट अबॅकस अकॅडमी मध्ये भारतासह 29 देशातील विद्यार्थी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिकत आहेत.

----- Advertisements -----

   

 एव्हरेस्ट अकॅडमी शहराबरोबर अकोले सारख्या दुर्गम भागातही काम करते. अकोल्याचे गट शिक्षण अधिकारी कुमावत यांनी यांचे विशेष कौतुक केले. यावेळी अबॅकेसच्या लेवल पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना "अबॅकस मास्टर" ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच अकॅडमी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. पाच मिनिटात जलद गतीने गणिते सोडवून नवीन विक्रम प्रस्थापित केले. यामध्ये 190 बेरीज, वजाबाकी ,164 गुणाकार तसेच 129 भागाकार केले. या स्पर्धेत 22 विद्यार्थी चॅम्पियन ठरले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमोल बागुल यांनी केले.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम