भक्ती शक्तीचा नवरात्र उत्सव साजरा; हजारो भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ; बरसात में हमसे मिले तुम, सजन तुमसे मिले हम बरसात असे म्हणत दांडियावर तरुणाईचे पावले थिरकली
संगमनेर : भारत रेघाटे
शहरात पाच नद्याचा संगम आहे. तसेच संगमनेर शहरात अनेक मंदिरे आहेत. मंदिराचे गाव म्हणून संगमनेरची एक आगळी वेगळी ओळख आहे. कामाख्या माता, महालक्ष्मी माता, रेणुका माता, संतोषी माता, देवी गल्ली येथील सप्तशृंगी माता, रेणुका माता, दिल्ली नाका येथील रेणुका माता, साईनाथ चौकातील चौंडेश्वरी माता, रंगार गल्ली येथील शितला देवी माता ,नेहरू चौकात तसेच साळी वाड्यातील रेणुका माता, देवाचा मळा येथील कृष्णा भिडे यांची महाकाली माता मंदिर, कासार समाजाचे कालिका माता मंदिर, तसेच नि-हाळी समाजाचे कालिका देवी मंदिर असे नानाविध मंदिरे असून नवरात्रातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस मंदिरामध्ये होम हवन, महापूजा, अभिषेक आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.

"बरसात बरसात में, हमको मिले तुम सजन, तुमको मिले हम सजन बरसात में " या तालावर गरबा आणि रास दांडियामुळे तरुणाईचे पावले नऊ दिवस चांगलीच थिरकली. कामाख्या माता मंदिराचे पूजारी भानू जोशी तर संतोषी माता मंदिरात अकोले बायपास येथील सप्तशृंगी माता मंदिर, देवी गल्लीतील सप्तशृंगी आणि रेणुका माता मंदिर या ठिकाणी अनेक हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवसही पूर्ण केला. देवाचा मळा येथील महाकाली मंदिरात श्रीकृष्ण भिडे या मंदिराचे पुजारी आहेत अनेक भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेतला. या मंदिराची देखभाल शिक्षक संतोष भिडे, पूजा भिडे उभयता बघतात. शिक्षक संतोष भिडे म्हणाले की, महिलांची शैक्षणिक उन्नती होणे गरजेचे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसची देवीची मूर्ती बसवणे पर्यावरणास घातक असून यावर ठोस निर्णय घेतले पाहिजे. तर गृहिणी पूजा भिडे म्हणाल्या की, महिलांची सुरक्षा यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न झाले तरच खरा नवरात्र उत्सव साजरा होईल.

विविध नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमा बरोबर सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात आले. गल्लीसह उपनगरातही रास दांडिया आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर झगमगाटून गेला होता. नवरात्री निमित्ताने शनिवार रविवारी महिला भगिनींसाठी यशोधन मैदानावर रंगत दांडियाची हा कार्यक्रम संपन्न झाला रविवार 28 सप्टेंबर रोजी देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनी महिलां दांडिया आनंद घेतला. युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा.दुर्गा तांबे, डॉ. मैथिली तांबे यांनीही दांडीया चा आनंद घेतला आमदार सत्यजीत तांबे डॉ मैथिली तांबे आयोजित 'आय लव संगमनेर' मार्फत विजेत्या महिलांना पैठणी तसेच गृहोपयोगी वस्तुचे वितरणही करण्यात आले.
