ब्रेकिंग न्यूज :
भारत

बिबट्याने युवकाचे तोडले लचके ;हल्ल्यात 21 वर्षीय आदिवासी मजूर ठार

Blog Image
एकूण दृश्ये: 473

बिबट्याने युवकाचे तोडले लचके ; हल्ल्यात 21 वर्षीय आदिवासी मजूर ठार 

    संगमनेर : भारत रेघाटे

बिबट्याच्या हल्ल्यात मोलमजुरी करणाऱ्या 22 वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

    आदिवासी समाजातील पप्पू बाळू दुधवडे वय 22 ब्राह्मणवाडा म्हसवंडी ता. संगमनेर हा तरुण हा तरुण जागीच ठार झाला. शनिवारी सकाळी ७ वाजता मजुरी साठी बेलापूर गावी तो गेला होता. परंतु रात्री घरी परतत असताना पेट्रोल संपल्याने पायी येत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तो युवक जागीच गतप्राण झाले.

    तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावांतर्गत असलेल्या मल्हारवाडीतील भिसे वस्ती डांबरी रस्त्याच्या कडेलाच सदरची घटना घडल्याचे समजते. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बिबट्याने लचका घेतलेला मृतदेह आढळून आला आहे.

----- Advertisements -----

     याबाबत काही लोकांनी गावचे पो.पाटील केशव त्रिभुवन, भगवान काळे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी अकोले पोलीस स्टेशन व वनविभाग अकोले यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. सी. पाटील, वनरक्षक दीपक शिंदे, सुनील शिर्के ,नितीन वारे, एस.के बढे, आर.एस आंबरे, बहिरु बेनके, सुनील कुकडवाळ, दीपक गवारी यांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच या ठिकाणी नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे. अकोले पोलिस उपनिरीक्षक व्हि.टी.घोडे, पो.हे.बापुराव देशमुख, जे.जे. ठिकेकर आदि उपस्थित होते. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतूळ येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

   दरम्यान परिसरात वाघ, बिबट्या, तरस,कोल्हे, लांडगे अशा हिंस्र प्राण्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. जुन्नर तालुक्यात नरभक्षक बिबटे पकडून अकोले तालुक्याच्या वनक्षेत्रात सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेने बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने सदर नरभक्षक बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच.पीडित कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी बेलापूर गावचे समाजसेवक भगवान काळे, राहुल लांडे, भास्कर भिसे, म्हसवंडी गावचे सरपंच मंगेश बोडके आदी ग्रामस्थांनी केली आहे.

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम