ब्रेकिंग न्यूज :
भारत

बाबूजींमुळे अनेकांचे जीवन कृतार्थ झाले ;

Blog Image
एकूण दृश्ये: 142

बाबूजींमुळे अनेकांचे जीवन कृतार्थ झाले ;  ॲड. प्रेमानंद रूपवते यांचा स्मृतिदिन साजरा

    संगमनेर प्रतिनिधी 

आम्हाला त्यांचा जवळून सहवास मिळाला. त्यामुळे आमचे जीवन कृतार्थ झाले. बाबूजी एक उत्कृष्ट वक्ते. समाजकारणी , राजकारणी आणि शैक्षणिक विचारवंत अभ्यासक होते. संविधानावर त्यांचा गाढा अभ्यास होता. बाबूजी एक दिलदार आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल भरभरून कौतुक केले. बहुजन शिक्षण संघाचे, काल. ॲड. प्रेमानंद दादासाहेब रूपवते उर्फ बाबूजी यांचा 7 वा स्मृतिदिन कार्यक्रम सिद्धार्थ नाईट हायस्कूल ,संगमनेर येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त आणि सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सन्मा. एम. डी. सोनवणे ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि सिद्धार्थ नाईट हायस्कूल शाळा सक्षमीकरण समितीचे सदस्य सन्मा. सूर्यकांत शिंदे यांनी काल. ॲड प्रेमानंद दादासाहेब रूपवते उर्फ बाबूजी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

----- Advertisements -----

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबूजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास जगताप यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी काल. ॲड. प्रेमानंद दादासाहेब रूपवते उर्फ बाबूजी यांच्या विविध पैलूंवर मनोगते व्यक्त केली. बाबुजींच्या 7 व्या स्मृतिदिनानिमित्ताने सिद्धार्थ नाईट हायस्कूल येथे त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाबूजींच्या स्मृतींना आणि विचारांना उजाळा देत असताना बाबूजींचे व्यक्तिमत्व हे विविध पैलूंनी घडलेले होते. आम्हाला त्यांचा जवळून सहवास मिळाला. त्यामुळे आमचे जीवन कृतार्थ झाले. बाबूजी एक उत्कृष्ट वक्ते होते. उत्कृष्ट समाजकारणी , राजकारणी आणि शैक्षणिक विचारवंत होते ,अभ्यासक होते. संविधानावर त्यांचा गाढा अभ्यास होता. बाबूजी एक दिलदार आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी बहुजन शिक्षण संघ संस्थेचे विश्वस्त एम. डी. सोनवणे सर , शाळा सक्षमीकरण समितीचे सदस्य सूर्यकांत शिंदे मुख्याध्यापक विकास जगताप यांसह सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक विकास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन पवार सर यांनी  केले. तर आभार चोपडे मॅडम यांनी मानले.

 

----- Advertisements -----

 

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम