ब्रेकिंग न्यूज :
भारत

बेभान बुलेट चालवून रिल्स बनवणारे दोन युवक गंभीर ; तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल ;

Blog Image
एकूण दृश्ये: 286

बेभान बुलेट चालवून रिल्स बनवणारे दोन युवक गंभीर ;तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल ;  चित्तथरारक व्हिडिओ व्हायरलची जिल्ह्यात चर्चा

     संगमनेर : 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये दोन तरुण फुटपाथ वर अतिशय धोकादायक व बेदरकारपणे बुलेट चालवून स्टंट करत असताना गाडीवरचा ताबा सुटल्याने दोघे युवक खाली पडून गंभीर जखमी झाले होते. या तरुणांनी ही स्टंटबाजी रिल्स बनवण्यासाठी केल्याचे दिसून येत असल्याचा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. तसेच गेली तीन आठवडे उलटूनही पोलीस प्रशासन अनभिज्ञ राहिल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

      सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चेला एक वेगळेच उधान आले होते. परंतु सदरचा व्हिडिओ पोलीस प्रशासन यांच्यापर्यंत पोहोचल्याने या घटनेची तात्काळ दखल पोलीसांना घ्यावी लागली.

----- Advertisements -----

सदरची घटना ही मंगळवार दि 26/8/ 2025 रोजी रात्री 11.30 वाजता  केवळ रिल्स बनवण्यासाठी, रात्रीच्या वेळी अतिशय धोकादायक अशी स्टंटबाजी या तरुणांनी केली केली आहे या रिल्स बनवण्याच्या नादात रॉयल एनफिल्ड जीटी 650 एम एच 4 एल ए 2531 बुलेट वरील ताबा सुटुन अपघात झाला. ते दोघे यात गंभीर जखमी झाले होते.  त्यांनीच परस्पर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार देखील घेतले. त्यांच्याच एका मित्राने या घटनेची रिल्स बनवून ती सोशल मीडियावर शेअर केली. सुदैवाने या घटनेत त्यांच्या शिवाय अन्य कोणी जखमी झाले नाही.

      या व्हिडिओ संबंधाने पोलिसांनी शहानिशा केली असता सदरची घटना ही संगमनेर शहरातून जाणारा पुणे नाशिक महामार्गावरील संगमनेर कॉलेज जवळ असलेल्या 132 के .व्ही जवळील फुटपाथवर हा चित्तथरारक आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला. सदर व्हिडिओ वरून पोलिसांच्या तपासाची चक्र गतीने फिरली. पोलिसांनी यातील तरुणांची ओळख उघड करताच यश अनुप अरगडे (अरगडे मळा ),प्रतीक सचिन गुंजाळ (साई श्रद्धा चौक ) त्यांच्यावर शहर पोलीसात भारतीय न्याय संहिता कलम 281, 125, 49 सह कलम मोटर वाहन कायदा 184,189 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून दोघांनाही नोटीस देण्यात आली. दोघेही जखमी असल्याकारणाने त्यांच्या कडून लेखी माफीनामा घेण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत सावंत यांनी केली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

पोलिसासमोर दिला कबुली जबाब :

आम्ही चुकीच्या पद्धतीने स्टंटबाजी केली असून आम्ही स्वतः या घटनेस जबाबदार असल्याचे या युवकांनी सांगितले. या घटनेत सुदैवाने मोठा हादसा झाला नाही सुदैवाने आम्हीही वाचलो स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास घातक ठरणाऱ्या रील्स बनवू नये असा संदेश युवकांनी या घटनेतून देत आम्हाला पश्चात्ताप झाल्याची कबुली त्यांनी दिली.

बेशिस्त रॅश ड्रायविंग चालकांवर होणार गुन्हे दाखल :- वाघचौरे

शहर तालुक्यात आणि परिसरात बेजबाबदार,बेशिस्त रॅश ड्रायविंग करताना आढळून आल्यास अथवा त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यास अशा वाहन चालकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.

----- Advertisements -----

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक