ब्रेकिंग न्यूज :
भारत

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी रात्र शाळा म्हणजे सिद्धार्थ नाईट हायस्कूल ,संगमनेर - जगताप

Blog Image
एकूण दृश्ये: 240

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी रात्र शाळा म्हणजे सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर - जगताप 

{ मुख्याध्यापक पदी विकास जगताप यांची नियुक्ती }

  संगमनेर ( प्रतिनिधी )

           रात्र ही वैऱ्याची नसून रात्र ही मैत्रीची आहे. स्पर्धेसह रोजगार आणि महागाईच्या खाईत कितपत पडलेला वर्ग शिक्षणापासून वंचित राहतांना दिसत असले तरी त्यांना एक आशेचा किरण सिद्धार्थ नाईट हायस्कूल ,संगमनेर या रात्र शाळेच्या माध्यमातून आशा पल्लवित करणारा ठरणारा आहे.

             महाराष्ट्रात एक नामांकित नाईट स्कूल म्हणून सिद्धार्थ नाईट हायस्कूल संगमनेरच्या शाळेचा नाम्मोल्लेख होतो. परंतु अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊनही स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही. अर्न अँड लर्न अर्थात कमवा आणि शिका या धर्तीवर दिवसभर काम करून रात्रीचे शिक्षण घेत आपले उज्ज्वल भविष्य ते घडवू शकतात असे प्रतिपादन सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक विकास जगताप यांनी केले. रात्र शाळेचा आज पहिला दिवस असल्याने या पहिल्याच दिवशी प्रवेशाला शाळेने उत्सवाचे स्वरूप दिले. गुलाब पुष्प आणि पुस्तके देत प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत करत करण्यात आले. एकीकडे हातात पुस्तक लगेच शाळेला सुरुवात हा अनोखा उपक्रम सिद्धार्थ नाईट हायस्कूलने राबवला. गरीब ,वंचित आणि दुर्बल घटकातील स्त्री ,पुरुष आणि कामगार वर्ग सिद्धार्थ नाईट हायस्कूलमध्ये स्वतःचे भविष्य घडवित आहेत. दिवसभर कष्टाची कामे करून आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण घेण्यासाठी या रात्र शाळेत श्रमिक वर्ग प्रवेश घेतात. आज पर्यंत अनेक विद्यार्थी या शाळेने घडविले असून विविध क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत. तर यापूर्वी एका विद्यार्थीनीने इंग्रजी सारख्या विषयात संपूर्ण पुणे बोर्डातून एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये  प्रथम क्रमांकाने अर्थात 100 पैकी 90 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक येण्याचा विक्रम केला आहे.

----- Advertisements -----

                समाजातील ज्या - ज्या व्यक्तींचे शिक्षण अपूर्ण राहिले असेल. अशा सर्वच स्त्री -पुरुष तसेच श्रमिक कामगारांनी मुलांनी संगमनेर सिद्धार्थ नाईट हायस्कूल विद्यालयात प्रवेश घेऊन स्वतः:चे भवितव्य घडवावे. तसेच सदरची माहिती आपले शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार अशा गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवावी असे आवाहन संस्थेच्या वतीने तसेच नवनियुक्त मुख्याध्यापक श्री जगताप यांनी केले आहे.  

              बहुजन शिक्षण संघाचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी प्राचार्य बी. आर. कदम म्हणाले की, रात्र शाळांचे प्रमाण खूप कमी आहे. परिस्थिती हालाखीची असल्याने सोशितांना दिवसभर काम करावे लागतात. त्यामुळे अनेक मुले शाळेपासून वंचित असतात. अशा मुलांना रात्र शाळा खऱ्या अर्थाने जीवनाची शाळा ठरू शकेल असे सांगत संगमनेर येथील सिद्धार्थ नाईट स्कूल हे युनिट फार महत्त्वाचे आहे. आम्ही संस्थाचालक म्हणून या सिद्धार्थ नाईट हायस्कूलकडे एक  आशेचा किरण म्हणून विशेष लक्ष देत आहे. विशेष करून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. पहिल्याच दिवशीची उपस्थिती लक्षणीय असल्याचे बघून मन भरून आल्याची भावना त्यांनी कदम यांनी व्यक्त केली. 

          बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त एम. डी. सोनवणे म्हणाले की, सरकारचा उद्देश खूप चांगला आहे. हल्ली शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे बदल होत आहेत. विद्यार्थी वर्गांचे स्वागत केलेच पाहिजे. कारण त्यामुळे एक उर्मी निर्माण होते. उपेक्षित आणि दिवसभर काम करणाऱ्या मुलांसाठी ही शाळा संजीवनी आहे असे ते म्हणाले. 

----- Advertisements -----

            शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ए.पी. बनसोडे म् म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब रूपवते  यांच्यामुळे आम्ही घडलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. के एस गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शैलजा भालेराव, दीपाली पवार, दीपाली सांबरे, सुषमा वाकचौरे, वर्षा चोपडे, वसीम मणियार, श्री डोंगरे, श्री भालेराव सह पालकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 नवनियुक्त मुख्याध्यापक श्री विकास जगताप यांच्याविषयी :;                              

            तिन्ही भाषांवर प्रभूत्व असलेले विकास जगताप यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांची नियुक्ती मुख्याध्यापक म्हणून केली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून बहुजन शिक्षण संघ या संस्थेची स्थापना 1948 मध्ये झाली. या संस्थेचे विविध विद्यालये, महाविद्यालये आणि वसतीगृह विविध ठिकाणी आहेत. सिद्धार्थ नाईट हायस्कूल ,संगमनेर या विद्यालयाची स्थापना जून 1970 मध्ये झाली. संस्थेच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने विद्यालयाची खूप मोठी भरभराट झाली असून संस्थेचा विशाल महाकाय वटवृक्ष डोलाने उभा राहिलेला आज दिसत आहे. 1 जून 2025 रोजी विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक म्हणून श्री जगताप यांची नियुक्ती संस्थेच्या आणि शासनाच्या नियमाधीन सर्वानुमते करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य. बी. आर. कदम, कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते , सेक्रेटरी मिलिंद गायकवाड, विश्वस्त उत्कर्षा रुपवते, विश्वस्त एम. डी. सोनवणे, कार्यकारी रजिस्ट्रार राजेंद्र एडके यांच्या सह जगताप यांच्या नियुक्तीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम