अधिकारी आरामात ,इंदिरानगर अंधारात : महिलांचा संताप अनावर : टाळे ठोकणार, रस्त्या रस्त्यावर आंदोलनाचा वनवापेटणार :- रवींद्र कानकाटे
संगमनेर { प्रतिनिधी }
इंदिरानगर अंधारात वीज वितरणचा खेळखंडोबा , लपंडावाने महिलांचा संताप चांगलाच उफाळला असून आता आंदोलन अटळ असल्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी दिला आहे.

इंदिरानगर परिसरात गेल्या. अनेक दिवसांपासून वीज वितरणचा लपंडाव खेळ सुरूच आहे. दिवसा लाईट गायब, रात्री अचानक अंधार वीज कर्मचारी थोडीशी गंध पावडर’ करून गेल्याने तेवढ्या पुरती लाईट चमचम करती असा काहीसा अनुभव इंदिरानगर परिसरातील नागरिकांना येत आहे. मात्र रोजचा त्रास सहन करत विजेच्या अनिश्चिततेत येथील शाळकरी मुले महिला जगत आहेत. शिवसेना शहरप्रमुख रवींद्र कानकाटे यांनी थेट वीज वितरण अधिकाऱ्यांवर ताशेरेच ओढले. इंदिरानगर आणि संगमनेर परिसरात वीज वितरणाने नेमका कोणता तमाशा उभा केला आहे ? वारंवार फ्युज उडणे, डीपीवर लोड येणे, वायर जळणे, आणि नंतर तात्पुरते डागडुजीचे डाव हे सर्व नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेणारे आहे. हे डोळेझाक करणारे धोरण वीज वितरण कंपनीला नडणार असल्याचे कानकाटे म्हणाले.
दरम्यान, डीम लाईटमुळे पाण्याच्या मोटारी नीट चालत नसल्याने महिलांना पाण्या अभावी पहाटेपासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अंधारात स्वयंपाक, पाण्याविना धावपळ इंदिरानगरचा दैनंदिन कार्यक्रमच ठरला आहे.
कानकाटे म्हणाले, तातडीने डीपी दुरुस्त करून आधुनिक यंत्रणा बसवा, नाहीतर या निष्काळजीपणाचा हिशेब आम्ही रस्त्यावर उतरून विचारू असा इशाराच त्यांनी दिला. स्थानिक नागरिक याबाबत प्रचंड संतापले असून एकप्रकारे प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे आता बस्स झालं! वीज वितरणचा लपंडाव बंद झाला पाहिजे, नाहीतर रस्ता रस्त्यांवरच आंदोलन पेटेल !
